पवारांच्या 'पॉवर गेम'नंतर भाजपच्या हालचाली, मोदींच्या उपस्थितीत होणार उमेदवारांवर शिक्कामोर्तब

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 29, 2019 09:33 AM IST

पवारांच्या 'पॉवर गेम'नंतर भाजपच्या हालचाली, मोदींच्या उपस्थितीत होणार उमेदवारांवर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची भाजप मुख्यालयात आज बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये राज्याच्या विधानसभा उमेदवारांच्या नावावर अंतिम निर्णय घेऊन नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी हे उपस्थित असणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. ईडी प्रकरणात आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे चर्चेच्या केंद्रस्थानी आले. या प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. त्यानंतर आता भाजपनेही हालचाली सुरू केल्या आहेत. दिल्लीत आज होणाऱ्या भाजपच्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. तसंच त्यानंतर उमेदवार यादीची घोषणा होण्याचीही शक्यता आहे.

युतीबाबतही होणार निर्णय?

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरीही अद्याप शिवसेना-भाजप युतीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे आज दिल्लीतील बैठकीत भाजपचे नेतृत्व याबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील युतीचा निर्णय होतो का, हे पाहावं लागेल.

शरद पवारांच्या खेळीनंतर बदललं राजकीय समीकरण

Loading...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा सत्ता काबीज करणं भाजपसाठी सोपं असल्याचा दावा करण्यात येत होता. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं ईडी प्रकरणात नाव आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं. ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर मवाळ भूमिका न घेता फ्रंटफूटवर खेळणं पवारांनी पसंत केलं. त्यामुळे भाजपसमोर नवं आव्हान निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शरद पवारांच्या ईडी प्रकरणात काँग्रेस, वंचित आघाडी आणि मनसेसह भाजपचा मित्रपक्ष असलेली शिवसेनाही पवारांच्या बाजूने मैदानात उतरली. त्यामुळे भाजपची अधिकच अडचण झाली आहे. एकीकडे शरद पवारांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असताना मित्रपक्ष शिवसेनेनंही पवारांची पाठराखण केली असल्याने भाजप एकाकी पडली आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

VIDEO : अजित पवार कुठून लढणार? जयंत पाटलांनी केलं जाहीर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2019 09:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...