विवेक कुलकर्णी(प्रतिनिधी),
मुंबई, 19 जून- मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अधिवेशनात विरोधकांपेक्षा जास्त आक्रमक दिसत आहेत. बुधवारी (19 जून) विधानसभेचे कामकाज सुरू होताच प्रश्नोत्तरांच्या तासात विरोधकांपेक्षा सत्ताधारी आमदार एकनाथ खडसे सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करताना दिसले. सौर पंपांच्या विषयानंतर आता आदिवासी भागातील कुपोषणाच्या विषयावर खडसेंनी मंत्र्यांना धारेवर धरले. कुपोषणाचे सर्वाधिक बळी युती शासनाच्या काळातच गेल्याचा आरोप खडसेंनी केला. नवीन आदिवासी मंत्र्यांच्या उत्तरांवर संताप व्यक्त करत खडसेंनी सरकारला लक्ष्य केले.
खडसेंनी आपली नाराजी अशी जाहीर व्यक्त करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात खडसेंना स्थान मिळालं नाही. सरकार तर नाहीच नाही तर पक्ष संघटनेतही खडसेंना बाजूला केले. याचीही सल खडसेंच्या मनात आहे. त्यामुळेच 'पक्ष वाढवण्यासाठी बाहेरचे लोक आयात करावे लागतात', असे उद्गार खडसे यांनी नुकतेच काढले होते.
दरम्यान, बुधवारी सकाळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. एकनाथ खडसे विधिमंडळाच्या पायऱ्याजवळ येताना दिसताच त्यांनी 'निष्ठावंतांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो', अशा घोषणा दिल्या. दुसरीकडे, आमदार सुरेश धस, आमदार राहुल कूल येताच 'आयाराम गयाराम' अशा घोषणा विरोधकांनी देऊन सगळ्यांचे लक्ष्य वेधून घेतले.
पण कोणी राजीनामा दिला नाही...खडसेंची खदखद
जुन्या लोकांना संधी मिळत नाही, त्यामुळे भाजप आमदारांमध्ये नाराजी आहे. पण निर्णय मुख्यमंत्र्यांनाच घ्यायचा आहे. मी राजीनामा दिल्यानंतर अनेंकांवर आरोप झाले. पण, कोणी राजीनामा दिला नाही,अशी खदखद एकनाथ खडसे यांनी केली होती. मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्याने खडसेंनी दिल्लीत नाराजी व्यक्त केली होती.
युतीत आयारामांना बक्षिशी तर निष्ठावंतांना धुपाटणं...
भाजप आणि संघपरिवारात खरंतर आयारामांना लगेच मंत्रिपद देण्याची परंपरा नाही. पण, विरोधी पक्षनेते विखेंना थेट कँबिनेट मंत्रिपदाची बक्षिशी देऊन मुख्यमंत्र्यांनी भाजपतील निष्ठावंतांसह विरोधकांनाही मोठा धक्का दिला आहे. तिकडे सेनेतही बाहेरच्यांना मंत्रिपदांची खैरात वाटून निष्ठावंताना पुन्हा एकदा वाटाण्याच्या अक्षता वाटल्या गेल्यात. भाजपत आयारामांना पहिल्यांदाच रेड कार्पेट विखेंसाठी तर भाजपने चक्क 'परंपरा'ही मोडली! सेनेतही बाहेरच्यांना मंत्रिपदं तर निष्ठावंताना पुन्हा वाटाण्याच्या अक्षता वाटण्यात आल्या. फडणवीस सरकारचा बहचर्चित आणि बहुप्रलंबित मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला. पण त्यात विखे, क्षीरसागर, सावंत सारख्या आयारामांनाच थेट कँबिनेट मंञिपदाची बक्षिशी मिळाल्याने युतीच्या निष्ठावंतांमध्ये मोठी नाराजी उफाळून आली. 'सीएम इन वेटिंग' फेम खडसेंनी तर पुन्हा एकदा आपल्या मनातली खदखद ही अशी जाहीरपणे बोलूनही दाखवली.
शिवसेनेतही नाराजीची विस्फोट होऊ पाहतो. पण हा पक्षच मुळात मातोश्रीच्या आदेशावर चालत असल्याने बिचारे निष्ठावंत आहे त्यातच समाधान मानताहेत.पण तानाजी सावंतसारख्या लोकांची पक्षाला गरज ही पडतेच, असं सूचक विधान करायलाही राजेश क्षीरसागरसारखे प्रबळ मंत्रिपदाचे दावेदार विसरत नाहीत.
सेनेतील या नाराजी बद्दल थेट सावंतांनाच विचारलं असता त्यांनी मातोश्रीच्या शिस्तीकडे बोट दाखवलं. खंरतर, सेनेत निष्ठावंतावर अन्याय होण्याची ही पहिलीच वेळ नाही.. पण शिस्तबद्ध भाजपचं काय? तिथं तर याआधी बाहेरच्यांना ही अशी पदांची खैरात कधीच वाटली गेलेली नाही... मग तरीही मुख्यमंत्र्यांनी हे धाडस का केलं असावं तर त्याचं उत्तर आगामी विधानसभा निवडणुकांच्या रणनीतीत सापडेल.कारण विधानसभेआधी थेट विरोधी पक्षनेताच जर मंत्रिपदी बसवला तर त्याचा विरोधकांच्या मनोबलावर नक्कीच परिणाम होणार आहे.
खडसेंची एण्ट्री झाली अन् अजित पवारांसह विरोधकांनी मुख्यमंत्र्यांला लगावला टोला