Elec-widget

भाजपच्या उमेदवार यादीत मुलं, मुली, भाचे, सुना आणि जावई

भाजपच्या उमेदवार यादीत मुलं, मुली, भाचे, सुना आणि जावई

भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीवर नजर टाकली तर घराणेशाहीची अनेक उदाहरणं दिसतात. भाजप नेत्यांचा मुलगा, जावई, मुली, सुना, भाऊ, भाचे या सगळ्यांची नावं यादीत आहेत.

  • Share this:

मुंबई, 1 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर या पहिल्या यादीमध्ये विद्यमान 12 आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. दरम्यान, नागपूर दक्षिण-पश्चिम- देवेंद्र फडणवीस, कोथरूड- चंद्रकांत पाटील, सातारा- शिवेंद्रराजे, कसबा- मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

या यादीत एकनाथ खडसे, विनोद तावडे या नेत्यांची नावं नाहीत. एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. त्याचबरोबर गणेश नाईक यांचंही नाव नाही.

या यादीवर नजर टाकली तर घराणेशाहीची अनेक उदाहरणं दिसतात. भाजप नेत्यांचा मुलगा, जावई, मुली, सुना या सगळ्यांची नावं यादीत आहेत. एक नजर टाकूया या घराणेशाहीवर.

हेमंत सावरा - विष्णू सावरांचा मुलगा

सुनील कांबळे - दिलीप कांबळेंचे भाऊ

Loading...

देवयानी फरांदे - ना. स. फरांदे यांची सून (नाशिक मध्य )

आकाश फुंडकर - भाऊसाहेब फुंडकर यांचा मुलगा (खामगांव )

समीर मेघे - दत्ता मेघे यांचा मुलगा (हिंगणा )

राणा जगजितसिंह पाटील - पद्मसिंह पाटील यांचा मुलगा (तुळजापूर )

संदीप नाईक - गणेश नाईक मुलगा (ऐरोली)

(हेही वाचा : 'पक्षासोबत प्रामाणिक राहणं गुन्हा असेल तर तो मी केलाय';खडसेंची पहिली प्रतिक्रिया)

पंकजा मुंडे - गोपीनाथ मुंडेंची मुलगी (परळी)

सिद्धार्थ शिरोळे - माजी खासदार अनिल शिरोळे यांचा मुलगा (शिवाजीनगर)

वैभव पिचड - मधुकर पिचड यांचा (मुलगा अकोले)

मोनिका राजळे - माजी आमदार राजीव राजळे यांच्या पत्नी (शेवगाव)

राजीव राजळे - बाळसाहेब थोरात यांचे भाचे

अमल महाडिक - मुन्ना महाडीक यांचे भाऊ - कोल्हापूर दक्षिण

मदन भोसले - प्रतापराव भोसले यांचा मुलगा - वाई

स्नेहलता कोल्हे - शंकरराव कोल्हे यांची सून (कोपरगाव)

भारत गावित - माणिकराव गावित यांचा मुलगा (नवापूर)

संतोष दानवे - रावसाहेब दानवे मुलगा (भोकरदन)

प्रशांत ठाकूर - माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा मुलगा (पनवेल)

संभाजी निलगेकर पाटील - माजी खासदार रुपताई निलंगेकर यांचा मुलगा (निलंगा)

अतुल भोसले - माजी आमदार दिलीपराव देशमुख यांचे जावई (दक्षिण कराड)

==================================================================================================

VIDEO : उपमुख्यमंत्री कोण होणार? चंद्रकांत पाटील म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2019 03:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...