बायको, मुलगा, मुलगी, सून, जावई ... भाजपचं प्रत्येकी सहावं तिकीट नेत्यांच्या नातेवाईकाला

बायको, मुलगा, मुलगी, सून, जावई ... भाजपचं प्रत्येकी सहावं तिकीट नेत्यांच्या नातेवाईकाला

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या 125 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यातल्या 19 जागांवर नेत्यांच्या कुटुंबीयांना तिकिटं देण्यात आली आहेत. याचा अर्थ प्रत्येक 6 उमेदवारांपैकी एक जण भाजप नेत्यांचा मुलगा, मुलगी, सून, पत्नी किंवा भाचा, भाची आहेत.

  • Share this:

मुंबई, 4 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या 125 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यातल्या 19 जागांवर नेत्याच्या कुटुंबीयांना तिकिटं देण्यात आली आहेत. याचा अर्थ प्रत्येक 6 उमेदवारांपैकी एक जण भाजप नेत्यांचा मुलगा, मुलगी, सून, पत्नी किंवा भाचा, भाची आहेत.

या यादीची सुरुवात पंकजा मुंडेंच्या नावापासून होते. गोपीनाथ मुंडेंची मुलगी पंकजा मुंडे पुन्हा एकदा परळी विधानसभेतून लढत आहेत. त्याचबरोबर एकनाथ खडसेंच्या ऐवजी त्यांची मुलगी रोहिणी खडसे- खेवलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

खामगावमधून माजी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचा मुलगा आकाश फुंडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

नवी मुंबईत ऐरोलीमध्येही माजी मंत्री गणेश नाईक यांचा मुलगा संदीप नाईक यांना उमेदवारी देण्यात आली होती पण त्यांनी वडिलांसाठी माघार घेतली. आता गणेश नाईक हेच इथले भाजपचे उमेदवार आहेत. अकोल्यातून माजी मंत्री मधुकर पिचड यांचा मुलगा वैभव पिचड यांना तिकीट देण्यात आलं आहे.

(हेही वाचा : अयोध्या प्रकरणी 17 ऑक्टोबर तारीख महत्त्वाची, सुप्रीम कोर्टाने दिली ही सूचना)

नवापूरमधूनही माजी मंत्री माणिकराव गावित यांचा मुलगा भरत गावित आणि भोकरदनमधून रावसाबाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत.

वाईमधून माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचा मुलगा मदन भोसले यांना उमेदवारी मिळाली आहे.

भाजपने पुणे कँटॉनमेंटमधून सुनील कांबळे यांना तिकीट दिलं आहे. ते माजी मंत्री दिलीप कांबळे यांचे भाऊ आहेत.

कोपरगावमध्ये माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या सूनबाई स्नेहलता कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

विक्रमगडमध्ये विष्णु सावरा यांचा मुलगा हेमंत सावरा भाजपकडून निवडणूक लढवणार आहेत.

(हेही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का, मुंबईचे हे माजी खासदार शिवसेनेत)

शेवगाव मतदारसंघातून माजी आमदार राजीव राजळेंच्या पत्नी मोनिका राजळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

कोल्हापूर दक्षिणमधून माजी आमदार मुन्ना महाडिक यांचा भाऊ अमल महाडिक निवडणूक लढवतील.

नाशिक मध्य मतदारसंघात माजी आमदार ना. स. फरांदे यांची सून देवयानी फरांदे आणि दक्षिण कराड मतदारसंघात दिलीप देशमुख यांचे जावई अतुल भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

हिंगण्यामधून माजी खासदार दत्ता मेघे यांचा मुलगा समीर मेघे निवडणूक लढवत आहेत.

तुळजापूरमधून माजी खासदार पद्मसिंह पाटील यांचा मुलगा राणा जगजितसिंह पाटील यांना तिकीट देण्यात आलं आहे.

शिवाजीनगरमधून माजी खासदार अनिल शिरोळे यांचा मुलगा सिद्धार्थ शिरोळे, निलंग्यातून माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांचा मुलगा संभाजी पाटील निलंगेकर आणि पनवेलमधून माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा मुलगा प्रशांत ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

===========================================================================================

VIDEO : प्रणिती शिंदेंना धक्का, राष्ट्रवादीने उभा केला उमेदवार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2019 05:55 PM IST

ताज्या बातम्या