एकाच दिवशी भाजपचा डबल अटॅक : आंबेडकर आणि राजू शेट्टींना मोठा धक्का

एकाच दिवशी भाजपचा डबल अटॅक : आंबेडकर आणि राजू शेट्टींना मोठा धक्का

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या तरी भाजपमध्ये आयारामांचा ओघ कायम आहे. एकाच दिवशी वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला धक्का बसला आहे.

  • Share this:

मुंबई, 26 सप्टेंबर :  विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या तरी भाजपमध्ये आयारामांचा ओघ कायम आहे. एकाच दिवशी वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला धक्का बसला आहे. वंचित बहुजन आघाडीतून MIM बाहेर पडल्यानंतर आधीच गणितं बदलत असताना आता प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचे सरचिटणीस गोपिचंद पडळकर यांनीच राजीनामा दिला आहे. ते भाजपच्या वाटेवर असल्याचं वृत्त आहे. दुसरीकडे राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी गुरुवारी राजीनामा दिला आहे. तेही भाजपच्या वाटेवर आहेत. या दोन घडामोडींमुळे प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांना मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे.

गोपीचंद पडळकर हे वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडणार अशी चर्चा होती. त्यांनी राजीनामा दिल्यानं त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. पडळकर धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. ते भाजपच्या तिकिटावर जत किंवा खानापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

हे वाचा - भाजपचे 112 उमेदवार फायनल होणार, दिल्लीत तयार होतोय प्रचाराचा 'मास्टर प्लॅन'

नाराज नेत्यांनी दुसऱ्या पक्षातून तिकीट मिळवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांनीसुद्धा राजीनामा दिल्यानं राजू शेट्टी यांना राजकीय फटका बसू शकतो. लोकसभा निवडणुकीच्या आधी सदाभाऊ खोत राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेपासून वेगळे झाले.

हे वाचा - विधानसभा निवडणूक : काळ्या पैशांवर Income Taxची राहणार करडी नजर

आता विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर संघटनेतून बाहेर पडले आहेत. हे दोन्ही नेते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

------------------------------

पुण्याच्या महापूरावरून भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2019 08:35 PM IST

ताज्या बातम्या