मुंबई, 23 मार्च : आज विधान परिषदेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आमने-सामने आपल्याचं पहायला मिळालं. युती तोडल्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला तर उद्धव ठाकरे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. मात्र याचवेळी बोलताना मुनगंटीवार यांनी 'उद्धवजी पुन्हा एकदा शांततेनं विचार करा, झाड वाढवायचा विचार करा' असं म्हणत ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे युतीची ऑफरच दिल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.
नेमकं काय म्हणाले मुनगंटीवार?
सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. उद्धवजी मी भेटून तुम्हाला स्वतः सांगायचो फळ येतील पण तुम्ही झाडाशी नातं तोडलं. तुम्ही झाडाशी नातं तोडलं त्याला आता मी काय करणार? मी येवून व्यक्तीगत सांगायचो की या झाडाला कोणतं खत पाहिजे, मात्र तुम्ही ते खत न टाकता दुसरंच खत टाकलं. मी एकदा नाही तीनदा विनंती केली. आजही वेळ गेलेली नाही शांततेत विचार करा, झाड वाढवायचा विचार करा असं मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना म्हटलं.
दीपोत्सवाची संकल्पना कशी सूचली? राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा
उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
तर तुम्ही खताऐवजी निर्मा टाकल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देखील मुनगंटीवार यांना चोख प्रत्युत्तर दिलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कालच्या भाषणावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. गेल्या 18 वर्षापासून ते घासले, पुसलेले भाषण होते. मी माझी भूमिका मांडली आहे. एवढी वर्ष कारवाई होत नाही, आता होते. स्क्रिप्ट आली त्यानुसार बोलले असणार आणि रातोरात कारवाई झाली. राज्यात इतरही अनेक अनधिकृत गोष्टी आहेत त्यांच्याकडे माहिती असेल तर त्यांनी पत्र द्यावे, असा टोमणा उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना लगावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Devendra Fadnavis, Raj Thackeray, Sudhir mungantiwar, Uddhav Thackeray