Home /News /maharashtra /

कोल्हापूरमध्ये पुन्हा पेटला राजकीय वाद, बंटी पाटील आणि मुन्ना महाडिक आमने-सामने

कोल्हापूरमध्ये पुन्हा पेटला राजकीय वाद, बंटी पाटील आणि मुन्ना महाडिक आमने-सामने

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून राजकीय नेते आमने सामने आले आहेत.

कोल्हापूर, 16 ऑगस्ट : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून राजकीय नेते आमने सामने आले आहेत. पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील आणि माजी खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्या कलगीतुरा रंगू लागला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात राजकीय वातावरण तापलं आहे. 'पालकमंत्री सतेज पाटील निष्क्रिय आहेत. पाटील यांना बदलून हसन मुश्रीफ यांना पालकमंत्री करा,' अशी मागणी माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे. त्यावर पाटील यांनीही जोरदार पलटवार केला आहे. 'पालकमंत्री बदलणं म्हणजे पेट्रोल पंपावरचा कामगार बदलणं नव्हे,' असं म्हणत सतेज पाटील यांनी महाडिक यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. या वादात हसन मुश्रीफ यांनी उडी घेतली. 'एकदा पीपीई किट घालून कोरोना वार्डात जाऊन या. सतेज पाटील पालकमंत्री म्हणून चांगलं काम करत आहेत, अशा शब्दांमध्ये हसन मुश्रीफ यांनी पाटील यांची पाठराखण केली आहे. दरम्यान, 'कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जवळपास गेली पाच महिने लॉकडाऊनसह अन्य प्रतिबंधक उपायांव्दारे कोरोनाला हरविण्याचे प्रयत्न शासन आणि प्रशासन यांच्याकडून युध्दपातळीवर केले जात आहेत. असे असले तरी गेल्या महिनाभरात कोल्हापूर जिल्ह्यात 12 हजाराहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील जनतेच्या सक्रीय पुढाकाराने कोरोना विरुध्दच्या युध्दात निश्चितपणे जिंकू असा आत्मविश्वास बाळगला आहे. त्यांचा हा आत्मविश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रत्येकाने नियमांची अंमलबजावणी करून कोरोनाला हरविण्यात पुढाकार घेणे गरजेचे आहे,' असं नुकतच सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Satej patil

पुढील बातम्या