Home /News /maharashtra /

Maharashtra band: दमदाटी करुन बंद केला जातोय, सरकारचं नाव बंद सरकार; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

Maharashtra band: दमदाटी करुन बंद केला जातोय, सरकारचं नाव बंद सरकार; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

Maharashtra band: महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदवर (Maharashtra Band) विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई, 11 ऑक्टोबर: महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदवर (Maharashtra Band) विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी या बंदला ढोंगीपणाचा कळस असल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. राज्य सरकारने पुकारलेला बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे. या बंदमधून सरकारचा ढोंगीपणा उघड झाला आहे, असा हल्लाबोल फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. तसंच आजचा बंद हा सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद आहे. देवेंद्र फडणवीसांनी पुढे म्हटलं की, या सरकारला थोडीही नैतिकता असेल तर या सरकारने आज संध्याकाळपर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करावं, अन्यथा त्यांचा ढोंगीपणा उघड होईल. देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारवर ही टीका केली आहे. हेही वाचा- Breaking News: पूँछमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक, 5 भारतीय जवान शहीद लखीमपूरच्या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्रात बंद पुकारला गेला. पण महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी हे सरकार एकही पैसा देत नाही. शेतकरी संकटात आहे. हे सरकार आल्यापासून दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, असं म्हणत सरकारने बांधावर जाऊन 25 हजाराच्या घोषणा केल्या, 50 हजाराच्या घोषणा केल्या, पण या सर्व घोषणा हवेत विरल्या. अनेक संकटांमध्ये सरकारनं शेतकऱ्यांना मदत केलेली नाही आणि जरी केली असेल तरी ते अपुरी मदत आहे. यामुळे भाजपचेच सरकार बरं होतं असं म्हटलं जात,असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. मावळमध्ये गोळीबार हेच जालियनवाला होतं मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर याच सरकारने गोळीबार केला होता, असं म्हणत फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. याच सरकारने मावळला पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. गोळीबार करणाऱ्यांना आंदोलन करण्याची नैतिकता तरी आहे का? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. मावळमध्ये गोळीबार झाला तो जालियनवाला बाग होता, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. तर आजचा बंद संवेदना दाखवणारा नसून राजकीय पोळी भाजण्यासाठीच करण्यात आला असल्याचं फडणवीस म्हणाले. हेही वाचा- संजय राऊतांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत दिली सर्वांत महत्त्वाची माहिती बंद सरकार- फडणवीस या सरकारचं नाव बंद सरकार आहे. या सरकारने आल्यापासून योजना, अनुदानं बंद केल्या. कोरोना काळात महाराष्ट्र बंद केला. आता कुठे छोटे दुकानदार आणि व्यापाऱ्यांचं गाडं रुळावर येत असताना सरकारने बंद पुकारला. म्हणून या सरकारचं नाव बंद सरकार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे. धमक्या देऊन, दमदाटी करून बंद पुकारला जात आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: BJP, Devendra Fadnavis

    पुढील बातम्या