भाजपचं धक्कातंत्र; पुण्यात विद्यमान खासदाराचं तिकीट कापलं

भाजपचं धक्कातंत्र; पुण्यात विद्यमान खासदाराचं तिकीट कापलं

पुण्यात देखील भाजपनं धक्कातंत्राचा वापर करत विद्यमान खासदाराचं तिकीट कापलं आहे.

  • Share this:

पुणे, 22 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं दुसरी यादी जाहीर केली. यावेळी भाजपनं धक्कातंत्राचा वापर करत पुण्यातील विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचं तिकीट कापलं आहे. त्यामुळे शिरोळे समर्थकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. उमेदवार निवडीपूर्वी भाजपनं सर्व्हे केला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून भाजप नवीन चेहऱ्यांना संधी देणार अशी चर्चा होती. त्यानंतर आता भाजपनं अनिल शिरोळे यांचं तिकीट कापत पालकमंत्री गिरीश बापट यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. दरम्यान, आता अनिल शिरोळे काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे. बापट गेली अनेक वर्ष खासदारकी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. अखेर अनिल शिरोळे यांना डच्चू देत पक्षाने बापट यांना संधी दिली आहे.

भाजपचे राज्यातील उमेदवार

नागपूर - नितीन गडकरी

धुळे- सुभाष भामरे

वर्धा - रामदास तडस

नंदुरबार - हीना गावित

रावेर - रक्षा खडसे

अकोला - संजय धोत्रे

गडचिरोली - अशोक महादेवराव नेते

चंद्रपूर - हंसराज गंगाराम अहिर

जालना - रावसाहेब दानवे

भिवंडी - कपिल पाटील

मुंबई उत्तर - गोपाल शेट्टी

उत्तर मध्य मुंबई - पूनम महाजन

अहमदनगर - सुजय विखे पाटील

बीड - डाॅ. प्रीतम मुंडे

लातूर - सुधाकरराव भालेराव-शृंगारे

सांगली - संजयकाका पाटील

सोलापूर : भाजपकडून लिंगायत समाजाचे जयसिद्धेश्वर स्वामी मैदानात, लढत तिरंगी?

लोकसभा निवडणूक 2019

लोकसभा निवडणुकांच्या (LokSabha Elections 2019) तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात सात टप्प्यांमध्ये 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान निवडणुका होतील. नवी दिल्लीमध्ये रविवारी निवडणूक आयोगाने (Election Commission) या तारखांची घोषणा केली. देशात सात टप्प्यांत तर महाराष्ट्रात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुका होतील.

11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार-

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूड, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम

18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान-

बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान

नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी

SPECIAL REPORT : राजे, तुम्ही चुकला!

First published: March 23, 2019, 8:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading