मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /देवेंद्रजी काय राव...तुमच्यामुळं मुख्यमंत्र्यांनाही निघावं लागतं! कोकण दौऱ्यावरून चित्रा वाघांची उद्धव ठाकरेंवर टीका

देवेंद्रजी काय राव...तुमच्यामुळं मुख्यमंत्र्यांनाही निघावं लागतं! कोकण दौऱ्यावरून चित्रा वाघांची उद्धव ठाकरेंवर टीका

तीन तासांच्या दौऱ्यात मुख्यमंत्री काय आढावा घेणार अशी टीका केली जात आहे. तर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh on CM visit to Konkan) यांनी देवेंद्र फडवणवीस (Devendra Fadanvis) कोकणच्या दौऱ्यावर गेले म्हणून मुख्यमंत्र्यांना निघावं लागलं असा थेट आरोप केला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 21 मे : तौक्ते चक्रीवादळामुळं (Tauktae cyclone) झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) शुक्रवारी कोकण दौरा केला. मात्र या दौऱ्यावरून आता भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल सुरू केला आहे. तीन तासांच्या दौऱ्यात मुख्यमंत्री काय आढावा घेणार अशी टीका केली जात आहे. तर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh on CM visit to Konkan) यांनी देवेंद्र फडवणवीस (Devendra Fadanvis) कोकणच्या दौऱ्यावर गेले म्हणून मुख्यमंत्र्यांना निघावं लागलं असा थेट आरोप केला आहे.

कोकणामध्ये प्रामुख्यानं रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. वादळामुळं इथा झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी मध्ये नुकसानाची पाहणी केली. वादळामुळं नुकसान झालेल्या शेती आणि फळबागांचे पंचनामे दोन दिवसांत तातडीनं करण्याचे आदेश त्यांनी दिले. मात्र उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यावर चित्रा वाघ यांनी घणाघाती टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस कोकणच्या दौऱ्यावर निघाल्यामुळं उद्धव ठाकरे यांना दौऱ्यावर निघावं लागल्याची टीका त्यांनी केली. ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये चित्रा वाघ यांनी, देवेन्द्रजी..काय राव तुम्ही थेट दुष्काळीभागात लोकांच्या मदतीला पोहोचतां,  मग इथे मुख्यमंत्र्यांनाही निघावं लागतं ना असं म्हणत टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना मी मदत करण्यासाठी आलो आहे, फोटोसेशनसाठी नाही असं म्हणत विरोधकांना टोला लगावला होता. त्यावरही चित्रा वाघ यांनी ट्वीटमधून उत्तर दिलं आहे. 3 तासाच्या कोकण दौऱ्यात त्यांनी किती गावांना भेटी दिल्या कितींचं सात्वंन केलं हे सगळं कृपा करून विचारू नका. आणि हो पर्यटन फोटोसेशन 3 तासात शक्य नाही म्हणून रद्द केल आहे, असा आरोपही चित्रा वाघ यांनी या ट्विटमधून केला.

हे वाचा-ममता बॅनर्जींच्या CM पदासमोरील मोठा अडसर दूर, 'या' मतदारसंघातून लढवणार निवडणूक

भाजप नेते आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. कोकणातील विविध जिल्ह्यांत गावागावात जाऊन नुकसानीची पाहणी आणि नुकसान झालेल्यांना ते धीर देत आहेत. फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका केली आहे. केवळ तीन तासांचा मुख्यमंत्र्यांचा हा दौरा किती किलोमीटरचा होता हे मोजून सांगू का? असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता दौऱ्यावरूनही भाजप आणि सरकारच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

First published:

Tags: Chitra wagh, Devendra Fadnavis, Uddhav thackeray