Home /News /maharashtra /

आधी शिवसेनेनं आता राष्ट्रवादीने पाडले खिंडार, नवी मुंबईत नगरसेवकांचा भाजपला रामराम!

आधी शिवसेनेनं आता राष्ट्रवादीने पाडले खिंडार, नवी मुंबईत नगरसेवकांचा भाजपला रामराम!

याआधी 3 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीने भाजपला आणखी जोरदार धक्का दिला आहे.

नवी मुंबई, 05 जानेवारी :  नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Navi Mumbai Municipal Election) तोंडावर भाजपमध्ये (BJP) गळती सुरूच आहे. नवी मुंबईत राष्ट्रवादीने भाजपचे नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्या गडाला सुरूंग लावला आहे.  भाजपच्या नगरसेविका आणि माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला आहे. नवी मुंबई महापालिकेची लवकरच निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याआधी 3 नगरसेवक  शिवसेनेत दाखल झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीने भाजपला आणखी जोरदार धक्का दिला आहे. स्वरा भास्करच्या एक्स बॉयफ्रेंडनी केलं लग्न; बॉलिवूडच्या 2 लेखकांचा विवाह भाजपच्या नगरसेविका दिव्या गायकवाड आणि माजी नगरसेवक वैभव गायकवाड  यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.  उच्च शिक्षित नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भाजपला फटका बसला आहे. उत्सुकता संपली! DHOOM-4 मध्ये हृतिक रोशन सोबत दिसेल 'हा' Action Hero विशेष म्हणजे, एका आठवड्यात भाजपमधील नगरसेवकांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यामुळे गणेश नाईकांच्या साम्राज्याला धक्का मानला जात आहे. मागील आठवड्यातच भाजपचे 3 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले होते.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या तिन्ही नगरसेवकांनी शिवबंधन बांधले होते.  नवीन गवते, अपर्णा गवते, दिपा गवते यांनी सेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेनं धक्का दिल्यानंतर आता राष्ट्रवादीने भाजपला धक्के पे धक्का दिला आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या