भाजप नगरसेवकाची मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि खुर्ची मारण्याचा प्रयत्न

भाजप नगरसेवकाची मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि खुर्ची मारण्याचा प्रयत्न

आग्रहाने मुद्दा मांडत असताना मुख्याधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यानेच वाद झाल्याचा दावा भाजप नगरसेवकाने केला. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

  • Share this:

गणेश गायकवाड, 30 जुलै : भाजप नगरसेवकाने मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ करीत खुर्ची फेकून मारल्याची धक्कादायक घटना अंबरनाथ पालिकेत घडली. मात्र नगरसेवकाचा प्रयत्न फसल्याने मोठा अनर्थ टळला. अंबरनाथ पालिकेच्या मुख्याधिकाऱ्याच्या केबिनमधील CCTVत हा सगळा प्रकार कैद झालाय. शहरात पूरस्थिती परिस्थिती असताना कामगारांना शनिवार आणि रविवारी का सुट्टी दिली हा सवाल भाजप नगसेवक सुनील सोनी यांनी मुख्याधिकारी देविदास पवार याना केला आणि याच मुद्यावरून दोघांमध्ये भांडण झालं.

पुराच्या पाण्यात अडकली ST बस, 29 प्रवाशांची थरारक सुटका

आग्रहाने मुद्दा मांडत असताना मुख्याधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा दावा नगरसेवक सोनी यांनी केलाय. कामगारांना सुट्टी दिल्याने नागरिकाचे हाल झाले आहेत. शहरात अस्वच्छता आहे त्याला जबाबदार कोण असा सवाल देखील सोनी यांनी केलाय. दरम्यान या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात नगरसेवक सोनी यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून या परिसरात मुसळधार पाऊस असल्याने प्रचंड पाणी साचलं आहे. नदी, नाले दुधडी भरून वाहू लागल्याने पूरस्थिती निर्माण झालीय. अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. अनेक सोसायट्यांमध्येही पाणी भरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झालीय.

मुसळधार पावसाचा दरोडेखोरांना फायदा, दुकानांवर डल्ला मारून लाखोंचा माल लंपास

पाण्याने वाहून आलेला कचरा आणि पावसामुळे उचलला न गेलेले कचरा अशी सगळीच घाण वाढल्याने रोगराई पसरण्याची भीती निर्माण झालीय. त्यामुळे पालिकेवरचाही ताण वाढलाय. लोकांच्या तक्रारींना आम्हांला उत्तरं द्यावी लागतात असं नगरसेवकांचं म्हणणं आहे. लोकांना प्रशासनाला सामोरं जावं लागत नाही त्यामुळे नागरिकांना आम्ही काय उत्तरं द्यायची असा सवालही नगरसेवकांनी केलाय.

First Published: Jul 30, 2019 05:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading