भाजप नगरसेवकाने महापालिकेच्या मुख्यालयासमोरच रिचवली कचऱ्याची गाडी

भाजप नगरसेवकाने महापालिकेच्या मुख्यालयासमोरच रिचवली कचऱ्याची गाडी

प्रशासनाविरुद्ध आंदोलन करताना त्या नगसेवकाने 'स्वच्छ भारत' अभिनयाचा कचरा केल्याची टीका होतेय.

  • Share this:

गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड 10 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा करून पाच वर्ष झालीत. मात्र शहराच्या पातळीवर यावर पाहिजे तसं काम होत नाही. सर्व देशात प्रसिद्ध असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयात सत्ताधारी भाजपच्याच एका नगरसेवकाने प्रशासनाच्या विरोधात चक्क कचऱ्याचीच गाडी आणून ओतली. प्रशासन ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप या नगरसेवकाने केला. मात्र त्याविरुद्ध आंदोलन करत असताना त्यांनी स्वच्छ भारत अभिनयाचा कचरा केल्याची टीका होतेय.

नागपुरात शाळकरी मुलांच्या जिवाशी शिक्षण संस्थेचा खेळ

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आहे. पुण्यात कचऱ्याचा प्रश्न नवा नाही. मात्र आता पिंपरी-चिंचवडमध्येही कचऱ्याच्या अनेक समस्या निर्माण होताहेत. शहरातील कचरा उचलला जात नसल्याची तक्रार भाजपच्याच नगरसेवकांनी करत आंदोलनही केलंय. या आंदोलनामुळे काही काळ तणावही निर्माण झाला होता.

कचरा उचलणारा ठेकेदार व्यवस्थित काम करत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी केलाय. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे  ढीग साचले आहेत, शिवाय साथीचे आजारही पसरू लागलेत. मात्र हे सगळं ज्यांच्या दुर्लक्षामुळे होतंय त्या ठेकेदारांना प्रशासन पाठीशी घालत असल्याचा घराचा आहेर त्यांनी दिलाय.

पवारांच्या आणखी एका शिलेदाराने सोडली साथ, आमदाराचा शिवसेनेत प्रवेश

प्रशासनातील अधिकारी सत्ताधारी नगर सेवकांच्या तक्रारीकडे कसं दुर्लक्ष करतात हेही त्यांनी निदर्शनास आणून दिलं. प्रश्न सुटत नसल्याने त्यांनी कचऱ्याची एक गाडी महापालिकेच्या आवारात आणून रिकामी केली त्यामुळे एकच गोंधळ उडाला. असं केल्याशीवाय अधिकाऱ्यांचे डोळेच उघडत नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं.

First published: July 10, 2019, 6:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading