मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भाजप नगरसेवकाची हत्या करून पसार झालेला छोटा राजनचा हस्तक नाशिकमध्ये जेरबंद

भाजप नगरसेवकाची हत्या करून पसार झालेला छोटा राजनचा हस्तक नाशिकमध्ये जेरबंद

नाणी दमण येथे भाजप नगरसेवकाची हत्या करून आरोपी आठ महिन्यांपूर्वी पसार झाला होता.

नाणी दमण येथे भाजप नगरसेवकाची हत्या करून आरोपी आठ महिन्यांपूर्वी पसार झाला होता.

नाणी दमण येथे भाजप नगरसेवकाची हत्या करून आरोपी आठ महिन्यांपूर्वी पसार झाला होता.

नाशिक, 27 ऑक्टोबर: मुंबईतील सराईत गुन्हेगार छोटा राजनच्या हस्तकला नाशिक पोलिसांनी गांधीधाम (देवळाली गाव) येथून अटक केली आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखा 2 च्या पथकाने सोमवारी रात्री ही कारवाई केली. केंद्र शासित प्रदेश असलेल्या नाणी दमण येथे भाजप नगरसेवकाची हत्या करून आरोपी आठ महिन्यांपूर्वी पसार झाला होता.

जयराम श्रावण लोंढे (रा.गांधीधाम, देवळाली गाव, नाशिक) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

हेही वाचा...पुण्यात या भागात भरवस्तीत खुलेआम हत्यारं नाचवतात गुन्हेगार, नागरिक भयभीत

नानी दमन याठिकाणी दमन महानगरपालिकेचे भाजपचे माजी नगरसेवक सलीम मेमन यांची त्यांच्या शोरूममध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. नानी दमन येथील समुद्रकिनाऱ्यावरील एक भूखंड रिकामा करण्यावरून सलीम मेमन यांची हत्या करण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे छोटा राजनचा हस्तक जयराम लोंढे याला सलीम मेमन यांच्या हत्येची सुपारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या हत्याकांडामुळे संपूर्ण नानी दमन परिसरात खळबळ उडाली होती.

दरम्यान, दरम्यान, गुजरातमधील नानी दमन पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी नाशिक शहरात असल्याची माहिती सहायक पोलीस उपनिरीक्षक शामराव भोसले यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी देवळाली गावातून आरोपी जयराम श्रावण लोंढे यास सापळा रचून अटक केली. त्यास पुढील कारवाईसाठी गुजरातमधील नानी दमण पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जयराम लोंढे हा छोटा राजनचा हस्तक असल्याचा देखील बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्यामराव भोसले यांना मिळलेल्या गुप्त माहितीच्या आधारे जयराम लोंढेला देवळाली गावातील गांधीधाम याठिकाणाहून अटक करण्यात आली. युनिट दोनच्या या कामगिरीचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात येत असून या प्रकरणी पुढील कारवाई करण्यात येत आहे.

हेही वाचा...VIDEO : असा अपघात तुम्ही कधीच पाहिला नसेल! जोरदार धडकेनंतर तरूण कारच्या टपावर

नाशिक शहर व राज्याबाहेरील गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेवून कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पोलीस अधिकार्‍यांना दिल्या आहेत. त्यानुसार नाशिक शहर पोलिसांनी पेट्रोलिंग सुरु केले आहे.

First published:

Tags: Crime news, Gujrat, Mumbai, Nashik