मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नाशिकमध्ये भाजपचेच नगरसेवक शिवसेनेच्या मेळाव्याला हजर, संजय राऊतांचा केला सत्कार

नाशिकमध्ये भाजपचेच नगरसेवक शिवसेनेच्या मेळाव्याला हजर, संजय राऊतांचा केला सत्कार

भाजपचे नगरसेवक विशान संगमनेरे यांनी  शिवसेनेच्या व्यासपीठावर राऊत यांचा सत्कार केला. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपचे नगरसेवक विशान संगमनेरे यांनी शिवसेनेच्या व्यासपीठावर राऊत यांचा सत्कार केला. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपचे नगरसेवक विशान संगमनेरे यांनी शिवसेनेच्या व्यासपीठावर राऊत यांचा सत्कार केला. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

  • Published by:  sachin Salve

नाशिक, 23 ऑक्टोबर : नाशिक महापालिका निवडणुकीच्या (Nashik Municipal Election) तोंडावर राजकीय वारे वाहू लागले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात भाजपचे (bjp) 3 ते 4 भाजपचे नगरसेवक उपस्थितीत असल्याची बाब समोर आली आहे. एवढंच नाहीतर भाजपच्या नगरसेवकांनी (BJP corporators) संजय राऊत यांचा सत्कार केला आहे. त्यामुळे नाशकात एकच खळबळ उडाली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर आहे.   सकाळी शहरातील विविध विकास कामाचे भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळे संपन्न झाले.  त्यानंतर राऊत यांच्या उपस्थितीत पदाधिकारी, लोकप्रतिनिधी संवाद मेळावा पार पडला. यावेळी संजय राऊत यांची चौफेर तोफ धडाडली.

यावेळी भाजपचे नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या 3 ते 4 विद्यमान नगरसेवकांनी हजेरी लावली होती. मात्र, त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकला नाही. पण, भाजपचे नगरसेवक विशान संगमनेरे यांनी  शिवसेनेच्या व्यासपीठावर राऊत यांचा सत्कार केला. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

टिकली वरून वादळ! जाहिरातीतल्या मॉडेल्सनी कुंकू न लावल्यावरून सोशल मीडिया तापला

यावेळी बोलत असताना राऊत म्हणाले की, ED-CBI ला घेऊन आमच्याशी लढायचं असेल तर ही गर्दी बघून घ्या. भाजप नगरसेवक विशाल संगमनेरे ही सुरुवात आहे. काल पासून १७ ते १८ लोक भेटून गेले आहे. सरकार पडणार पडणार म्हणणाऱ्यांनी हे बघावं. NCB पकडलेला गांजा घेऊन सरकार पडण्याच्या बाता मारता. हिंमत असेल तर त्यांना हलवून दाखवावा २८ तारखेला २ वर्ष होतील, असा इशाराच राऊत यांनी भाजपला दिला.

'अमित शहा आज जम्मू काश्मीर मध्ये गेले आहे. तिथे शीख, सैनिक मारले गेले, लडाख पार करून चीनच सैन्य आत घुसलं आहे आणि हे काय करताय. चीनने आपल्या पेक्षा जास्त लस टोचल्या. केंद्र सरकारने १०० कोटी लसीचा दावा खोटा आहे ते आम्ही पुराव्यानिशी सिद्ध करू. देशात ३५ कोटी पेक्षा एक लसही जास्त टोचली नाही, असा दावाही राऊत यांनी केला.

पेट्रोल-डिझेल च्या वाढत्या किंमतीवर कोणी बोलत नाही. यांना काय टोचायचे की बांबू घालाययचे ते बघू. त्याचे एक नेते हर्षवर्धन पाटील खरं बोलता, बहुतेक ते नशेत नसावे त्यांना गांजा मिळत नसेल. म्हणून ते म्हणे आम्हाला शांत झोप लागत नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

सुंदरा मनामध्ये भरली'मधील अभ्याचं ते बिंग फुटलं ; समोर आला पडद्यामागील Video

'हा बुलंद आवाज शिवसेनेचा तो कुणालाही दाबता येणार नाही. नाशिकमध्ये घोटाळा, पिंपरी चिंचवडमध्ये घोटाळा त्यांचे पुरावे किरीट सोमाया यांना दिले. त्यांनी या घोटाळ्याची चौकशी लावावी, मला त्यांची दानत बघायची आहे. १०० लोकांचे पुरावे माझ्याकडे आहे वेळ आली की आम्हीही बाहेर काढू.  समोर कोरोनाच संकट आहे म्हणून आम्ही शांत आहोत, असंही राऊत म्हणाले.

भाजपने तेव्हा शब्द फिरवला आणि लढाईला सुरुवात झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत शब्द दिला तो फिरवला फसवणूक केली म्हणून आम्ही खोटेपणा विरोधात लढलो. बाळासाहेब यांच्या आशीर्वादाने शब्द खरा झाला. रामायण-महाभारत कशामुळे झाले, खोटेपणामुळे झाले. रोज आमच्यावर हल्ले होत आहेत, जणू रोज भ्रष्टाचारचे पीक येतं की काय? असा सवालही राऊत यांनी विचारला,

याच नाशिकच्या भूमीतून सावरकर आलेत. त्या सावरकरांची बदनामी करण्याचे काम भाजपने सुरू केली. सावरकर यांनी माफी मागितली हे भाजपने सुरू केले. आम्ही कोणत्याही आघाडीत असो हिंदुत्व सोडणार नाही. शिवसेनेचे काम करणे ही एक नशा आहे. माझ्यासारखे लाखो शिवसैनिक काम करतात म्हणून शिवसेना  आज आहे, असंही राऊत म्हणाले.

'ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासठी ४० सभा घेतल्या,दंगली घडवल्या,पैशाच पाऊस पाडला मात्र तेथील जनतेन ममताना साथ दिली. बाहेरच्या शक्ती महाराष्ट्रावर चाल करून येताय त्यांना देखील आपली ताकत दाखवून द्यावं लागेल, महाराष्ट्र दिल्लीचा गुलाम नाही हे दाखवाव लागेल. विधानसभेत १०० आमदार आपले असावे असं काम करायचं आहे. उद्धव ठाकरे यांना केंद्रात बघायचं असेल तर जास्तीत जास्त आमदार खासदार निवडून द्यावे,असंही राऊत म्हणाले.

First published: