मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पवार कुटुंबाच्या राजकीय रथाचा 'पार्थ' कोण? शिंदेंनंतर भाजपनेही डिवचलं

पवार कुटुंबाच्या राजकीय रथाचा 'पार्थ' कोण? शिंदेंनंतर भाजपनेही डिवचलं

छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर का स्वराज्य रक्षक यावरून सुरू झालेला राजकीय वाद वेगळ्याच दिशेला जाताना दिसत आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 4 जानेवारी : छत्रपती संभाजी महाराजांबाबत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. भाजपने अजित पवारांविरोधात राज्यभर आंदोलन केलं, तसंच त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. अजित पवारांच्या या वक्तव्याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आलं असता शरद पवारांनी दिलेल्या उत्तरामुळेही वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

अजित पवारांनी केलेल्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचं असेल तर धर्मवीर म्हणा. ज्यांना त्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं असं वाटत असेल त्यांनी स्वराज्य रक्षक म्हणा, असं शरद पवार म्हणाले.

भाजपचा निशाणा

'अजित पवारांच्या धर्मवीर विषयावर शरद पवारांनी असहमती दर्शवली, यावरून समजते की पवार कुटुंबियांच्या राजकीय रथाचा पार्त नक्की कोण? हा संभ्रम निर्माण झाल्या. बाकी शरद पवारांनी नेहमीप्रमाणे जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याकडे कानाडोळा करून त्यांच्या वक्तव्याला मुक संमती दर्शवली,' असं ट्वीट भाजप महाराष्ट्राने केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाबत केलेल्या वक्तव्यावर शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा पवारांनी मी त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

शिंदेंनीही डिवचलं

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसला या मुद्द्यावरून डिवचलं आहे. त्यांच्या पक्षात अजित पवार आणि शरद पवार गट आहेत, म्हणून ते बोलत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. धर्मवीर पदी संभाजी राजे यांना वर्षानुवर्ष आहे. अजित पवारांनी माफी मागावी, त्यांना पण तोच नियम लागू होईल, अशी मागणीही एकनाथ शिंदे यांनी केली.

'मी कुठे म्हटलो माझ्या काकांना जाणता राजा म्हणा', अजित पवारांनी सुनावलं

First published:

Tags: Ajit pawar, BJP, NCP, Sharad Pawar