प्रचाराचा नारळ फोडत अमित शहांनी जाहीर केला भावी मुख्यमंत्री, शिवसेनेचा पत्ता कट?

प्रचाराचा नारळ फोडत अमित शहांनी जाहीर केला भावी मुख्यमंत्री, शिवसेनेचा पत्ता कट?

अमित शहा यांनी युतीचा फॉर्म्युला तयार होण्याआधीच मुख्यमंत्रिपदावर भाष्य करून शिवसेनेवर कुरघोडी केली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 सप्टेंबर : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे मुंबईत दाखल झाले आहेत. कलम 370 रद्द केल्याच्या मुद्द्यावर मुंबईत अमित शहा यांचं व्याख्यान होत आहे. या व्याख्यानाच्या माध्यमातूनच अमित शहांनी भाजपच्या विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला आहे. तसंच यावेळी अमित शहा यांनी युतीचा फॉर्म्युला तयार होण्याआधीच मुख्यमंत्रिपदावर भाष्य करून शिवसेनेवर कुरघोडी केली आहे.

'विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,' अशी आपल्या भाषणाची सुरुवात करत अमित शहा यांनी एकप्रकारे भाजपचा अजेंडा स्पष्ट केला. शिवसेनेकडून याआधी मुख्यमंत्रिपदावर दावा करण्यात आलेला आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न शिवसेना नेत्यांनी केला आहे. त्यामुळे आता अमित शहा यांनी युतीची घोषणा होण्याआधीच मुख्यमंत्रिपदावर भाष्य केल्याने शिवसेना आता काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावं लागेल.

कलम 370 वरून अमित शहांची फटकेबाजी

- काश्मीर अशांत नाही

- 99 टक्के लॅंडलाईन , 67 टक्के मोबाईल सुरु झालेत

- दिल्ली करारातच कलम 370 चं बीज आहे

- जवाहरलाल नेहरु यांच्या चुकीमुळेच पाकव्याप्त काश्मिरचा मुद्दा उभा राहिला

- अमित शहांचं कॉंग्रेसवर टीकास्त्र

- कलम 370 हटवणं हा भाजपसाठी राजकारणाचा विषय नव्हता

- राहुल तुम्ही तर आताच राजकारणात आलात आमच्या तीन पिढ्या काश्मिरसाठी बलिदान देण्य़ासाठी पुढे आल्य़ा

- काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे

VIDEO: 'लफडी केली तर सहन करा'; राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांची पवारांनी घेतली फिरकी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 01:29 PM IST

ताज्या बातम्या