Elec-widget

विधानसभेसाठी बीडमध्ये होणार मोठं शक्तीप्रदर्शन, पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला अमित शहा येणार

विधानसभेसाठी बीडमध्ये होणार मोठं शक्तीप्रदर्शन, पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला अमित शहा येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

  • Share this:

बीड, 2 ऑक्टोबर : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उपस्थित राहणार आहेत. बीड जिल्ह्यातील सावरगाव इथं पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याचं आयोजन केलं आहे. दसरा मेळाव्याच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी पंकजा मुंडे जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याची माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यातील राजकारण रंगतदार ठरत आहे. विरोधकांना शह देण्यासाठी पंकजा मुंडे आपली ताकद दाखवणार आहेत. या मेळाव्याला विधानसभा निवडणुकीतील भाजपचे 50 उमेदवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

भाजपची पहिली यादी आणि बंडखोरीची चर्चा

गेली काही दिवस सगळ्यांनाच उत्सुकता होती ती 'युती'च्या घोषणेची आणि जागावाटपाची. शेवटी चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर भाजप आणि शिवसेनेने अखेर पत्रक काढून 'युती'ची घोषणा केली आणि नंतर उमेदवार यादीही जाहीर करण्यात आली. त्यानंतर जे व्हायचं तेच झालं. अनेक मतदारसंघामध्ये बंडखोरांचं निशाण फडकलं. येत्या काही दिवसांमध्ये ही बंडखोरी थंड झाली नाही तर भाजपची अडचण होण्याची शक्यता आहे.

लोकसभेतल्या ऐतिहासिक यशामुळे सर्वच पक्षातल्या नेत्यांचं भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग झालं. त्यामुळे मतदारसंघात इच्छुकांची संख्याही वाढली आहे. 'युती' झाल्यामुळे मित्रपक्षांना जागा सोडाव्या लागल्याने या बंडोबांना शांत करण्याचं आव्हान भाजप नेत्यांसमोर आहे.

Loading...

विद्यमान आमदारांचा पत्ता कट

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीमध्ये विद्यमान 12 आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. दरम्यान, नागपूर दक्षिण-पश्चिम- देवेंद्र फडणवीस, कोथरूड- चंद्रकांत पाटील, सातारा- शिवेंद्रराजे भोसले, कसबा- मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपच्या पहिल्या यादीत एकनाथ खडसे, विनोद तावडे या नेत्यांची नावं नाहीत. एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आहे.

भाजपच्या महिला आमदारानी नाकारली राज ठाकरे-अजित पवारांची ऑफर, दिलं हे उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2019 09:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...