बारामतीत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वाद पेटणार, चंद्रकांत पाटलांचे पोस्टर्स फाडले

विधानसभा निवडणुकीत बारामतीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 5, 2019 05:41 PM IST

बारामतीत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वाद पेटणार, चंद्रकांत पाटलांचे पोस्टर्स फाडले

बारामती, 5 सप्टेंबर : आमागी विधानसभा निवडणुकीत बारामतीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. कारण नुकते बारामतीत भाजपचे पोस्टर्स फाडण्यात आले आहेत.

भाजपच्या बारामतीतील जनसंपर्क कार्यालयाचे 8 सप्टेंबर रोजी उद्घाटन होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उद्घाटन होईल. याच कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरात चौका-चौकात भाजपकडून पोस्टर्स लावण्यात आले आहेत. यातील एक पोस्टर अज्ञातांकडून फाडण्यात आलं. पोस्टर्स कुणी फाडले याचा पोलीस आता शोध घेत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत. विधानसभा निवडणूक जिंकत पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी भाजप-शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे. यासाठीच्या रणनीतीचा भाग म्हणून राष्ट्रवादीच्या नेतृत्वालाच लक्ष्य करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. बारामतीतून अजित पवारांना अडचणीत आणण्यासाठी भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

लोकसभा निवडणुकीतही भाजपने बारामती मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलं होतं. मात्र या निवडणुकीत पवार पॉवरसमोर भाजपचा निभाव लागला नाही. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या कांचन कुल यांचा जवळपास दीड लाख मतांनी पराभव केला. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध भाजपकडून रणनीती आखली जात आहे.

RSS आणि भाजपच्या मंत्र्याची पहिली बैठक

Loading...

विधानसभा निवडणुकीत पवारांचा गड असलेली बारामती कशी जिंकता येईल, याबाबतची व्यूवरचना आखण्यासाठी रायगडचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री असलेल्या रवींद्र चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी आरएसएसचे पदाधिकारी आणि भाजपचे स्थानिक नेते यांच्यासोबत बैठक घेतली होती.

बारामतीत असलेलं अजित पवार यांचं काम आणि दांडगा जनसंपर्क यामुळे हा मतदारसंघ काबीज करणं भाजपसाठी मोठं आव्हान आहे. त्यामुळेच भाजपकडून या मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी आरएसएसचीही मदत घेतली जात आहे. आगामी काळात बालेकिल्ला बारामतीत भाजपकडून पवारांना शह देणार की पवार पॉवर पुन्हा एकदा भाजपला अस्मान दाखवणार, हे पाहावं लागेल.

VIDEO : दुकानाबाहेर साड्या पाहत होत्या महिला, बैलाने मागून येऊन दिली धडक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2019 12:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...