News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'ए... चूप बसायचं', मदतीची मागणी करणाऱ्या पूरग्रस्तावर चंद्रकांत पाटलांची अरेरावी
  • VIDEO : 'ए... चूप बसायचं', मदतीची मागणी करणाऱ्या पूरग्रस्तावर चंद्रकांत पाटलांची अरेरावी

    News18 Lokmat | Published On: Aug 12, 2019 02:45 PM IST | Updated On: Aug 12, 2019 04:38 PM IST

    कोल्हापूर, 12 ऑगस्ट : कोल्हापूरमधील पुराच्या संकटातून नागरिक आता कुठे सावरत आहेत. अशातच या पूरग्रस्तांना मदतीचं आश्वासन देण्यासाठी गेलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावरच अरेरावी केली आहे. चंद्रकांत पाटील बोलत असताना एका पूरग्रस्तांनी त्यांच्याकडे सरसकट कर्जमाफीची मागणी केली. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी 'ए चू बसायचं' असं प्रत्युत्तर त्या पूरग्रस्ताला दिलं आहे. यावरून चंद्रकांत पाटलांवर आता चौफेर टीका होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी