राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत नवा ट्विस्ट, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानंतर संभ्रम वाढला

राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत नवा ट्विस्ट, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानंतर संभ्रम वाढला

चंद्रकांत पाटील यांच्या नव्या वक्तव्यामुळे राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 31 ऑगस्ट : राज्यसभा खासदार आणि कोकणातील मातब्बर नेते नारायण राणे भाजपमध्ये दाखल होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. ही चर्चा खरी असल्याचं सांगत स्वत: नारायण राणे यांनीही आपल्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केलं आहे. पण महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नव्या वक्तव्यामुळे राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

'राणेंचा भाजप प्रवेशाचा विषय माझ्या ताकदीबाहेरचा आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघे निर्णय घेतील,' अशी प्रतिक्रिया नुकतीच चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. शिवसेनेला विश्वासात घेऊन जर भाजप राणेंचा पक्षप्रवेश करून घेण्याच्या प्रयत्नात असेल तर राणेंसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. कारण कोकणातील राजकारणात नारायण राणेंचा नव्याने होणार उदय शिवसेनेसाठी अडचणीचा ठरू शकतो. म्हणून शिवसेना राणेंच्या भाजप प्रवेशाला विरोधच करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दलचा संभ्रम आणखीनच वाढला आहे.

नारायण राणे आणि राजकीय वर्चस्वाचा संघर्ष

महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्ती सतत चर्चेत असतात. नारायण राणे हे त्यातलंच एक नाव. पण सध्या नारायण राणेंची राजकीय अडचण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक राणेंसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंचा पराभव केला. तसंच त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे वैभव नाईक हे जाएंट किलर ठरले होते. त्यांनी थेट नारायण राणेंना पराभवाची चव चाखायला लावली होती. त्यानंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही निलेश राणेंना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यामुळे राणेंच्या राजकारणाला उतरती कळा लागली आहे, असं बोललं जाऊ लागलं.

राज्यातील राजकारणात राणेंना दोन मोठे धक्के

कोकणातील राजकारणाची पकड सैल झाल्याने स्वाभाविकच राणेंच्या राज्यातील राजकारणावरही मोठा परिणाम झाला. काँग्रेस नेतृत्वाकडून त्यांचं खच्चीकरण करण्यात आलं आणि राणेंनी काँग्रेस सोडली. पण राणेंसाठी हा शेवटचा धक्का नव्हता. काँग्रेसला रामराम केल्यानंतर मधल्या काळात राणेंनी भाजपमध्ये जाण्यासाठीही जोरदार प्रयत्न केले. पण भाजपमधील काही नेत्यांच्या विरोधामुळे त्यांचा पक्षप्रवेशही होऊ शकला नाही. त्यामुळे राणेंची चांगलीच अडचण झाली.

शिवसेना युतीत येताच राणे भाजपपासून दूर

मधल्या काळात शिवसेना सतत सत्तेविरोधात भूमिका घेत होती. अशातच भाजपनं कोकणात शिवसेनेला आव्हान देण्यासाठी राणेंना जवळ केलं. पण नंतर मात्र लोकसभेसाठी शिवसेनेसोबत युती झाली. त्यामुळे भाजपकडून राज्यसभेवर गेलेले नारायण राणे यांनी भाजपवरच टीकास्त्र सोडलं.

राजकीय कमबॅकसाठी विजय आवश्यक

कोकण आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत विजय खेचून आणणं राणेंसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. कारण राज्यातील सत्तेत काही वाटा मिळवायचा असल्यास स्वबळावर काही आमदार निवडून आणणं राणेंसाठी क्रमप्राप्त ठरणार आहे.

SPECIAL REPORT : पद्मसिंह पाटील शरद पवारांपासून का दुरावले?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 31, 2019 10:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading