मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : जुहू वार्डात 2017मध्ये भाजपला मिळाली सत्तेची चावी; आताची परिस्थिती काय?

BMC Election 2022 : जुहू वार्डात 2017मध्ये भाजपला मिळाली सत्तेची चावी; आताची परिस्थिती काय?

सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. मागच्या वेळेस भाजपचे सरकार असताना भाजप उमेदवार निवडून आला होता.

सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. मागच्या वेळेस भाजपचे सरकार असताना भाजप उमेदवार निवडून आला होता.

सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. मागच्या वेळेस भाजपचे सरकार असताना भाजप उमेदवार निवडून आला होता.

    मुंबई, 24 जुलै : मुंबई शहराच्या महापालिका निवडणुकीचे (BMC Election 2022) बिगुल वाजले आहेत. नव्या वॉर्ड रचनेनुसार आणि वाढलेल्या वॉर्डासह मुंबई महापालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) 236 वॉर्डाचे ओबीसी आरक्षणाशिवाय आरक्षण सोडत (Ward Reservation Lottery) काढण्यात आली आहे. दरम्यान, या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय विशेष आढावा घेतला आहे. जाणून घ्या, जुहू वार्ड क्रमांक 69 बद्दल. काय होती 2017मधील परिस्थिती -  जुहू वार्ड क्रमांक 69चा (Juhu Ward No 69) जर विचार केला तर यात गुलमोहर कॉलनी, डीएन नगर, चार बंगला आणि मुन्सी नगर या प्रमुख भागांचा समावेश होतो. जुहू वार्डचा 2017मधील निवडणुकीचा विचार केला तर याठिकाणी भाजप उमेदवार रेणू हंसराज यांनी बाजी मारली होती. याठिकाणी एकूण 9 उमेदवार होते. मात्र, प्रमुख लढत ही भाजप उमेदवार रेणू हंसराज आणि काँग्रेस उमेदवार भावना जैन या दोघांमध्ये होती. विजयी उमेदवार रेणू हंसराज यांना 8266 तर काँग्रेसच्या भावना जैन यांना 4561 इतकी मते मिळाली होती. याठिकाणी शिवसेना, भाजप, मनसे आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांनी आपला उमेदवार उभा केला होता. त्यात मतदारांनी भाजपला कौल दिला. 2017मध्ये झालेल्या निवडणुकीत जुहू वार्ड क्रमांक 69मध्ये एकूण 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये पाच अपक्ष उमेदवाराचाही समावेश होता. यावेळी विजयी भाजप उमेदवार रेणू हंसराज यांना 8266 तर काँग्रेसच्या भावना जौन यांना 4561, शिवसेनेच्या उमेदवार अंजली बाळा पालकर यांना 3833 आणि मनसेच्या उमेदवार नयना पल्लर यांना 1092मते मिळाली होती. या वार्डामध्ये एकूण मतदार हे 37,718 इतके आहेत. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका तब्बल इतके मते अवैध - निवडणुकीचा निकाल पाहिला तर भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला. त्यापाठोपाठ दोन नंबरवर काँग्रेस, तीन नंबरवर शिवसेना आणि चार नंबरला मनसे उमेदवार होता. 2017मध्ये 18506 मते अवैधही ठरविण्यात आली होती. याचाच फटका पराभूत उमेदवारांना बसला होता. नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. राज्यात झालेल्या या सत्तांतरानंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मागच्या वेळी 2017मध्ये याठिकाणी भाजपने बाजी मारली होती. सर्व प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणूक लढले होते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BMC, Election, Mumbai

    पुढील बातम्या