मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आज राज्यात विधान परिषद जागेसाठी BJP भरणार उमेदवारी अर्ज, मुंबईत राजहंस सिंह यांना उमेदवारी

आज राज्यात विधान परिषद जागेसाठी BJP भरणार उमेदवारी अर्ज, मुंबईत राजहंस सिंह यांना उमेदवारी

आज विधान परिषदेच्या (Legislative Council) जागेच्या उमेदवारीचे अर्ज भाजपाचे (BJP) वतीने भरले जाणार आहेत.

मुंबई, 22 नोव्हेंबर: आज विधान परिषदेच्या (Legislative Council) जागेच्या उमेदवारीचे अर्ज भाजपाचे (BJP) वतीने भरले जाणार आहेत. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी हे अर्ज भरण्यात येतील. मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) नगरसेवक यांच्या मतदानातून निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी भाजपाच्या वतीने आज दुपारी दोन वाजता राजहंस सिंह उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज भरणार आहे. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते अशिष शेलार, विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर उपस्थित राहतील.

हेही वाचा- IND vs NZ: टीम इंडियातील नव्या हिटरला हिटमॅनचा सॅल्यूट, रोहितचा VIDEO VIRAL

नागपूर येथे विधान परिषदेच्या रिक्त जागेवर चंद्रशेखर बावनकुळे आज अर्ज भरणार असून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करतील.

तर कोल्हापूर विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर झालेले अमल महाडिक उमेदवारी अर्ज दाखल करणे या वेळेस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा- केसांच्या आरोग्यासाठी Orange Peel Water चा असा करा उपयोग, केस होतील मुलायम, चमकदार 

धुळे येथून अमरिश पटेल , तर अकोल्यातून खंडेलवाल यांना भाजपाने उमेदवारी दिली असून हे देखील अर्जदार भरणार आहे.

मुंबईतून विधान परिषद दोन जागा रिक्त त्याठिकाणी भाजपाकडून राजहंस सिंह, तर शिवसेनेकडून वरळी माजी आमदार सुनिल शिंदे यांना उमेदवारी दिली. मुंबईतील विधान परिषदचेच्या दोन रिक्त जागेसाठी नगरसेवक मतदान करणार आहेत. सध्याची सेनेचे नगरसेवक 97 भाजपाचे 81 नगरसेवक आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाचे उमेदवार मताच्या कोट्यानुसार सहज विजयी होतात, मात्र अजून कोणी तिसरा उमेदवारी अर्ज दाखल केला तर मात्र चुरस वाढेल.

First published:
top videos

    Tags: BJP