मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : रामनगर वार्ड क्र. 50मध्ये 2017ला भाजपने मारली होती बाजी, यंदा काय होणार?

BMC Election 2022 : रामनगर वार्ड क्र. 50मध्ये 2017ला भाजपने मारली होती बाजी, यंदा काय होणार?

वार्ड क्रमांक 50 म्हणजे रामनगरमध्ये सुंदरनगर, महेशनगर, उद्योगनगर, रामनगर या भागाचा समावेश होतो.

वार्ड क्रमांक 50 म्हणजे रामनगरमध्ये सुंदरनगर, महेशनगर, उद्योगनगर, रामनगर या भागाचा समावेश होतो.

वार्ड क्रमांक 50 म्हणजे रामनगरमध्ये सुंदरनगर, महेशनगर, उद्योगनगर, रामनगर या भागाचा समावेश होतो.

    मुंबई, 22 जुलै : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात लवकरच होणार आहे. (BMC Election 2022) त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. दरम्यान, या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 50 बाबत (Ramnagar Ward no. 50) विचार केला तर याठिकाणी भाजपचा (Bjp) नगरसेवक आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी शिवसेना (Shivsena) पक्ष याठिकाणी निवडून येण्यासाठी चांगलेच प्रयत्न करणार आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय विशेष आढावा घेतला. जाणून घ्या, रामनगर वार्ड क्रमांक 50 बद्दल... 11 उमेदवार होते निवडणुकीच्या रिंगणात -  वार्ड क्रमांक 50 म्हणजे रामनगरमध्ये सुंदरनगर, महेशनगर, उद्योगनगर, रामनगर या भागाचा समावेश होतो. 2017च्या निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर याठिकाणी एकूण 42981 मतदार होते. त्यापैकी 22566 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. तसेच 379 मते नोटाला मिळाली होती. लोकसंख्येचा विचार केला तर येथील लोकसंख्या ही 48003 इततकी आहे. त्यात अनुसूचित जातीचे 1 हजार 733 तर अनुसूचित जमातीच्या 173 लोकांचा समावेश आहे. मागच्या निवडणुकीत याठिकाणी 11 उमदेवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यावेळी याठिकाणी भाजप उमेदवार यांनी शिवसेनेला जोरदार टक्कर देत विजय मिळवला होता. मतांची आकडेवारी जर पाहिली तर भाजप उमेदवार दीपक ठाकूर यांनी शिवसेनेचे दिनेश राव यांना पराभूत केले होते. भाजपचे दीपक ठाकूर यांना 10645 तर शिवसेनेचे दिनेश राव यांना 6783 मते मिळाली होती. तसेच काँग्रेसच्या स्नेहा झगडे यांना 2739, मनसेचे हरेश साळवी यांना 1429 मते मिळाली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिंतामणी द्विवेदी यांना फक्त 90 मते मिळाली होती. हेही वाचा - राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत शरद पवारांचे नाव, सोनिया गांधींचा असा आहे प्लॅन? नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. राज्यात झालेल्या या सत्तांतरानंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मागच्या वेळी राष्ट्रवादीच्या उमेदवारापेक्षाही जास्त मते ही अपक्षांना मिळाली होती. यावेळी वार्ड क्रमांक 50 मध्ये मतदार राजा कुणाच्या गळ्यात सत्तेची माळ घालतो, हे आगामी काळात निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. या निकालाची सर्वांना उत्सुकता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BMC, Election, Mumbai

    पुढील बातम्या