मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : दुर्गा नगर वार्डात भाजपचे वर्चस्व, यावेळी समीकरण बदलणार का?

BMC Election 2022 : दुर्गा नगर वार्डात भाजपचे वर्चस्व, यावेळी समीकरण बदलणार का?

वार्ड क्रमांक 74 मध्ये दुर्गा नगर, रुप नगर, गणेश नगर, कमाल अमरोही स्टुडिओ आदी भागांचा समावेश आहे.

वार्ड क्रमांक 74 मध्ये दुर्गा नगर, रुप नगर, गणेश नगर, कमाल अमरोही स्टुडिओ आदी भागांचा समावेश आहे.

वार्ड क्रमांक 74 मध्ये दुर्गा नगर, रुप नगर, गणेश नगर, कमाल अमरोही स्टुडिओ आदी भागांचा समावेश आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 24 जुलै : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात लवकरच होणार आहे. (BMC Election 2022) त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रं. 74 दुर्गानगर (Ward No. 74 Durganagar) बाबत बोलायचे झाले तर याठिकाणी 2017च्या निवडणुकीत भाजपच्या (Bjp Candidate) श्रीमती उज्वला श्रीकृष्ण मोडक या निवडून आल्या होत्या. मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 74 बद्दल. वार्ड क्रमांक 74 मध्ये दुर्गा नगर, रुप नगर, गणेश नगर, कमाल अमरोही स्टुडिओ आदी भागांचा समावेश आहे. आरक्षण सोडतीत हा वार्ड सर्वांसाठी खुला आहे. 2017मध्ये याठिकाणी भाजपच्या उज्वला मोडक या निवडून आल्या होत्या. त्यांना 9713 मते मिळाली होती. त्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, भाजप, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसही वेगवेगळे लढले होते. त्यात भाजपने विजय मिळवला होता. 2017च्या मुंबई मनपा निवडणुकीत वार्ड क्रमांक 74मधील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते -
  1. उज्वला मोडक, भाजप - 9713
  2. रचना रविंद्र सावंत, शिवसेना - 9255
  3. संध्या मोरे, मनसे - 2385
  4. पुष्पा मिलींद भोळे, काँग्रेस - 2422
  5. काशीबाई छब्बू उघडे, बहुजन समाज पार्टी - 547
  6. स्वाती सुहास बाणे, अपक्ष - 64
  7. रत्नमाला रमेश जगदाळे, अपक्ष - 74
  8. नाईक कल्पना रामचंद्र, काँग्रेस - 167, तर याव्यतिरिक्त 404 मते ही नोटाला मिळाली होती. या निवडणुकीत 25031 मते वैध ठरली होती.
हेही वाचा - ''राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी BJP ने शरद पवारांना उमेदवारी द्यावी'', संजय राऊतांनी केली मागणी मुंबई महानगरपालिकेच्या 2017 मधील सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 227 वार्ड होते. नव्या रचनेनुसार यंदा 236 वार्ड करण्यात आले. मुंबई शहरात 3, पूर्व उपनगरात 3 आणि पश्चिम 3 असे नऊ वार्ड वाढवण्यात आले. नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. राज्यात झालेल्या या सत्तांतरानंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मागच्या वेळी 2017मध्ये याठिकाणी भाजपने बाजी मारली होती. सर्व प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणूक लढले होते. त्यामुळे मतांचे विभाजन झाले होते. यावेळी वार्ड क्रमांक 74 दुर्गानगरची जनता नगरसेवक पदाची माळ कुणाच्या गळ्यात घालते, हे तर निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
First published:

Tags: BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या