मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : जय अंबिका नगर वार्डात 2017मध्ये भाजप विजयी, यावेळी काय होणार?

BMC Election 2022 : जय अंबिका नगर वार्डात 2017मध्ये भाजप विजयी, यावेळी काय होणार?

2017च्या निवडणुकीचा विचार केला तर त्यावेळी भाजपचे उमेदवार केतन शंकर बडगुजर हे निवडून आले होते.

2017च्या निवडणुकीचा विचार केला तर त्यावेळी भाजपचे उमेदवार केतन शंकर बडगुजर हे निवडून आले होते.

2017च्या निवडणुकीचा विचार केला तर त्यावेळी भाजपचे उमेदवार केतन शंकर बडगुजर हे निवडून आले होते.

  मुंबई, 23 जुलै : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. दरम्यान, या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 165 बाबत (Ward no. 165 BMC) विचार केला तर याठिकाणी भाजपचा नगरसेवक झाला होता. मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, जय अंबिका नगर वार्ड क्रमांक 165 बद्दल. 2017च्या निवडणुकीचा विचार केला तर त्यावेळी भाजपचे उमेदवार केतन शंकर बडगुजर हे निवडून आले होते. त्यांना 3431 मिळाली होती. तर या निवडणूकीत शिवसेना, काँग्रेस, समाजवादी पक्षाला हार पत्कारावी लागली होती. शिवसेना उमेदवार शुक्ला श्रीप्रकाश श्यामनारायण यांना 2743 मते, काँग्रेस उमेदवार आझमी मोहम्मद अबफ मोहम्मद असलम यांना 626 मते आणि समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला 165 मते मिळाली होती. 2017च्या निवडणुकीत वार्ड क्र. 165मधील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते -
  1. आजमी मोहम्मद अबफ मोहम्मद असलम, काँग्रेस - 626
  2. केतन शंकर बडगुजर, भाजप - 3431
  3. कैलास मधुकर दामुद्रे, जनकल्याण सेना - 28
  4. डिसोजा जस्टीन सायमन, अपक्ष - 92
  5. मुर्तझा सैफुद्दीन जवादवाला, बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी – 51
  6. कैकाडी संजु नागु, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया – 60
  7. शशीकांत सुधाकर कुंभारगण, अपक्ष - 86
  8. सना मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस - 2917
  9. मंत्री फिरोज जैनुद्दीन, समाजवादी पार्टी - 248
  10. गणेश नारायण पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 2480
  11. कमाल अहमद इकबाल अहमद शाह, एआयएमआयएम - 268
  12. अनिता अनिल शट्टी़, अपक्ष – 1228
  13. श्रीप्रकाश श्यामनारायण शुक्ला, शिवसेना - 2743,
  14. नोटा -19
  हेही वाचा - राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत शरद पवारांचे नाव, सोनिया गांधींचा असा आहे प्लॅन? नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. राज्यात झालेल्या या सत्तांतरानंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वार्ड क्रमांक 165 यावेळी सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे याठिकाणची सत्तेची गणिते बदलू शकतात ही शक्यता नाकारता येत नाही.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: BMC, Election, Mumbai

  पुढील बातम्या