सोलापूरमध्ये MIM च्या भूमिकेचा भाजपला फायदा, महापौरपदाच्या निवडणुकीत विजय

सोलापूरमध्ये MIM च्या भूमिकेचा भाजपला फायदा, महापौरपदाच्या निवडणुकीत विजय

भाजपला धक्का देण्याची रणनीती काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून आखण्यात येत होती.

  • Share this:

सागर सुरवसे, सोलापूर, 4 डिसेंबर : सोलापूर महापालिकेच्या महापौर निवडणुकीत भाजपचा विजय झाला आहे. भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांची सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झाली आहे. महापौरपदासाठी श्रीकांचना यन्नम यांना 51 मते तर एमआयएमच्या शेख यांना 8 मते मिळाली.

सोलापूरमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपला धक्का देण्याची रणनीती काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून आखण्यात येत होती. अपेक्षित संख्याबळ गाठण्यासाठी या महाआघाडीला एमएमआयमचीही साथ आवश्यक होती. मात्र महापौरपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत न जाता आपला उमेदवार देण्याची भूमिका एमआयएमने घेतली. त्यामुळे या संभाव्य आघाडीचा प्रयोग फसला आणि भाजपचा विजय सोपा झाला.

महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, बसपा, माकप या पक्षांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तिथेच भाजपचा विजय निश्चित झाला होता. मात्र एमआयएमने आपला उमेदवार रिंगणात उतरवल्याने ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. अखेर भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांनी 51 मते घेत एमएमयाएमच्या उमेदवाराचा दारूण पराभव केला.

दरम्यान, निवडणुकीच्या आधी भाजपविरुद्ध व्यवरचणा करणाऱ्याला शिवसेनेला संख्याबळ जमवण्यात अपयश आलं. एवढेच नव्हे तर महापौरपदाच्या निवडणुकीत बसपा आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका नगरसेवकाने भाजपला दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असणाऱ्या शिवसेनेचीच अडचण झाली.

सोलापूर महापालिका पक्षीय बलाबल -

एकूण : 102 जागा

भाजप - 49

शिवसेना - 21

कॉंग्रेस - 14

राष्ट्रवादी - 4

एमआयएम - 9

बसपा - 4

माकप - 1

Published by: Akshay Shitole
First published: December 4, 2019, 1:10 PM IST
Tags: BJPsolapur

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading