मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /समर्थकानंच बंडाचं निशाण फडकवल्यानंतर पंकजा मुंडेंनी सोडलं मौन, म्हणाल्या...

समर्थकानंच बंडाचं निशाण फडकवल्यानंतर पंकजा मुंडेंनी सोडलं मौन, म्हणाल्या...

भाजप हा माझ्या बापाचा पक्ष आहे. याला मला अहकांर नाही, तर प्रेम आहे.

भाजप हा माझ्या बापाचा पक्ष आहे. याला मला अहकांर नाही, तर प्रेम आहे.

भाजप हा माझ्या बापाचा पक्ष आहे. याला मला अहकांर नाही, तर प्रेम आहे.

सचिन जिरे, (प्रतिनिधी)

औरंगाबाद, 12 नोव्हेंबर: औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या (Aurangabad Graduate Constituency Election) निवडणुकीसाठी भाजपमध्ये (BJP) बंडखोरी झाली आहे. या मतदारसंघात भाजपच्या दोन इच्छुक उमेदवारांनी बंडाचं निशाण फडकावलं आहे. विशेष म्हणजे बंडखोर नेते पंकजा यांचे समर्थक आहेत. मात्र, भाजपकडून शिरीष बोराळकर यांना अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. आता यावर भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Bjp Leader Pankja Munde) यांनी मौन सोडलं आहे,.

पंकजा म्हणाल्या, 'मी शिरीष बोराळकर यांचं नाव दिलं नाही, हे मी त्यांना अगोदरच बोलावून सुचवलं होतं. पक्षानं जो निर्णय घेतला त्यासोबत मी आहे. भाजप हा माझ्या बापाचा पक्ष आहे. याला मला अहकांर नाही, तर प्रेम आहे. सर्वच जवळचे कार्यकर्ते, सगळं बळ लावण्यासाठी येथे आल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा आहे, तो पुन्हा खेचून आणू, असा विश्वास देखील पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा..आश्रमात घुसून महाराजांवर 8 अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला, औरंगाबादेतील थरार

मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी पंकजा मुंडे आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते.

नाराज असल्याची चर्चा व्यर्थ

पंकजा मुंडे म्हणाल्या, मी नाराज असल्याच्या चर्चा व्यर्थ आहेत. सगळेच माझ्या जवळचे कार्यकर्ते आहेत. मी सगळं बळ लावण्यासाठी इथे आले आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली.

पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रवीण घुगे यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून भाजपसोबत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. औरंगाबादमधून शिरीष बोराळकर यांना पक्षाने अधिकृतरित्या तिकीट दिले आहे. तर बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनीही बंडाचे निशाण फडकवत अर्ज भरला आहे. रमेश पोकळे हे पंकजा मुंडे गटाचे समर्थक मानले जातात.

उमेदवारी अर्ज भरताना पोकळे यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची मूर्ती आणली होती. त्यामुळे भाजपनं अधिकृत उमेदवार दिला असताना भाजपमधून आणखी दोन उमेदवारांनी अर्ज भरल्यानं पक्ष श्रेष्ठींसमोर पेच निर्माण झाला आहे.

महाविकास आघाडीचंही गणित बिघडणार?

भाजपमध्ये पदवीधर निवडणुकीवरून बंडखोरी सुरू असतानाच महाविकास आघाडीत सुद्धा सर्वकाही अलेबल नसल्याचं चित्र आहे. कारण महाविकास आघाडीत सत्तेत सोबत असणाऱ्या राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सुद्धा आपल्या पक्षाचा उमेदवार मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे.

हेही वाचा..नागपूरच्या महापौरांनी पडल्या गडकरींच्या पाया, भाजपमधील नाराजी नाट्यावर पडदा

पदवीधर निवडणुकीत मराठवाडा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी पक्षाकडे आहे. त्यामुळे सोबत असलेल्या इतर पक्षाने उमेदवार उभा करणे अपेक्षित नाही. मात्र असे असतानाही बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून सचिन ढवळे यांना उमेदवारी दिली असून याची घोषणा त्यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन केली.

First published:

Tags: Aurangabad, BJP, Maharashtra, Marathwada, Pankaja munde