भिवंडी, 11 नोव्हेंबर: ठाणेसह (Thane)पालघर (Palghar) जिल्ह्यात भाजप (BJP) पक्षांतर्गत गटबाजी चांगलीच चव्हाट्यावर आली आहे. कंटाळलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज अखेर भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केलं आहे. परिणामी ठाणे आणि पालघर जिल्ह्यात भाजप खिळखिळी होताना दिसत आहे.
ठाणे, पालघर विभागीय भाजप जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम चौधरी (Tukaram chaudhari) यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा...भाऊ-बहिणीच्या नात्यात आडवा आला 'भाजप', माजी कृषीमंत्री गहिवरले.. पाहा VIDEO
भाजप प्रदेश सचिव दयानंद चोरघे (Dayanand Chorage)यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांनतर ते कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होतं. मात्र, दयानंद चोरघे यांनी त्यांनीही आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ तुकाराम चौधरी यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
दयानंद चोरघे हे 2014 मध्ये भाजप मध्ये दाखल झाले होते. ते अगोदर काँग्रेसमध्ये ठाणे जिल्हा इंटकचे अध्यक्ष होते. तर निरीक्षक म्हणूनही काम पाहिलं होतं. मात्र, नरेंद्र मोदींच्या लाटेत ते भाजपवासीय झाले. भाजपमधील गटबाजी आणि नातेवाईकांचे पुनर्वसन सुरु असल्याने या सर्व बाबींना कंटाळून त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थित जाहीर प्रवेश केला. आता काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरु झाल्याने काँग्रेसची ताकत वाढू लागल्याचे पाहवयास मिळत आहे.
पृथ्वीराज चव्हाणांचं सूचक विधान
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे हात बळकट करायचे आहेत, असं सूचक विधान देखील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधील अनेकांच्या भूवया उचावल्या आहेत. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन स्वगृही परतलेले रणजितसिंह देशमुख यांचं त्यांनी स्वागत केलं. रणजितसिंह देशमुख यांच्यावर आमच्याकडून अन्याय झाला असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे. रणजितसिंह हे अत्यंत तडफेने काम करणारे नेते आहेत. आपण तीन पक्ष सत्तेत आहेत, त्यातून पक्ष बळकट करायचा आहे.
हेही वाचा..बँक खात्याशी संबंधित हे काम केलंय का? सीतारमन यांनी दिली मार्च 2021ची डेडलाइन
बाळासाहेब थोरात म्हणाले, रणजित देशमुख यांनी सूतगिरणी यशस्वी केली, याचं काय रहस्य आहे. हे त्यांनाच विचारावा लागेल. तर पृथ्वीराज चव्हाण हे देशपातळीवरील नेते आहेत. राज्यात काँग्रेस वाढवण्यासाठी त्यांचं मार्गर्शन लागणार आहे.
म्हणून साताऱ्यातील जबाबदारी तरुणांनी घेतली पाहिजे. पुन्हा एकदा काँग्रेसला वैभव मिळवून देण्याचं काम आपलं आहे. थोड्या अडचणी आहेत, पण आपल्याला परिश्रम घ्यायचे आहेत. आपण जनतेसाठी काम करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
तुम्ही मोठे व्हा, पक्ष आपोआप मोठा होईल, असंही बाळासाहेब थोरात यांनी रणजितसिंह देशमुख यांना उद्देशून सांगितलं.