बीड: प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विरोधकांनी गेले गंभीर आरोप

बीड: प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विरोधकांनी गेले गंभीर आरोप

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा वापर करत मतदारांना भावनिक करून राजकीय फायदा करत असल्याची टीकाही करण्यात आली आहे.

  • Share this:

सुरेश जाधव, प्रतिनिधी

बीड, 27 मार्च : भाजपच्या बीड लोकसभा उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला आहे. प्रीतम मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा निवडणुकीसाठी वापर केल्याचा आरोप बीडमधील अपक्ष उमेदवार कालिदास अपटे यांनी केला आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा वापर करत  मतदारांना भावनिक करून राजकीय फायदा करत असल्याची टीकाही करण्यात आली आहे.

'प्रीतम गोपीनाथ मुंडे' नावाने बीड जिल्ह्यातील नाथरा येथे मतदान यादीत नाव आहे. तर मुंबई येथील वरळीमध्ये प्रीतम गौरव खाडे नावाने त्यांचं मतदार यादीत नाव असल्याची टीकाही कालिदास यांच्य़ाकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबई वरळी येथील प्लॉट 1201 स्थावर मालमत्तेची माहिती प्रीतम मुंडे यांनी लपवली असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. प्रीतम मुंडे यांच्याकडे वेगवेळ्या नावाने दोन आयकर विभागाचे ओळखप्रत्र आहे असंही कालिदास यांनी म्हटलं आहे.

प्रीतम मुंडे या वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळात सहभागी आहेत. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या गुन्हय़ाची माहिती लपवली. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्याची मागणी कालिदास यांच्याकडून करण्यात आली आहे. अपक्ष उमेदवार कालिदास आपेट यांनी हा आक्षेप घेतला आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनीदेखील प्रीतम यांच्यावर असे अक्षेप घेतले आहे. निवडणूक अधिकारी या प्रकरणाची 4 वाजता सुनावणी करणार आहेत.

सध्याच्या खासदार डॉ. प्रितम मुंडेच बीडमध्ये भाजपच्या उमेदवार

गेल्या अनेक दिवसांपासून बीड बाबत उलट-सुटल चर्चा सुरू होती. पण "शंका घेण्याचं कुठलेही कारण नाही, आगामी लोकसभेला सध्याच्या खासदार डॉ. प्रितम मुंडेच बीडमध्ये भाजपच्या उमेदवार असतील," असं प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बीडमध्ये पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.

आगामी निवडणुकीत पक्षाचा उमेदवार कोण हे ठरले का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर रावसाहेब दानवे यांनी ‘शंका घेण्याचे कुठलेही कारण नाही, आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून सध्याच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे याच उमेदवार असतील हे स्पष्ट केलं होतं. पण भाजपच्या प्रीतम मुंडे यांच्या अर्जावर आता अक्षेप घेण्यात आला आहे.

सहा भाषेत बोलते धोनीची लेक; पाहा बाप-लेकीचा 'हा' VIDEO

First published: March 27, 2019, 2:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading