मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'राज्यात लवकरच सत्ताबदल, शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात' BJP नेत्याचा दावा

'राज्यात लवकरच सत्ताबदल, शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात' BJP नेत्याचा दावा

'शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात, लवकरच होणार सत्ताबदल' भाजप नेत्याचा दावा

'शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात, लवकरच होणार सत्ताबदल' भाजप नेत्याचा दावा

12 Shiv Sena mla are in our contact said BJP Leader: भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने केलेल्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

नांदेड, 9 ऑक्टोबर : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) स्थापन केली. मात्र, तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यातच विरोधी पक्ष असलेल्या भाजप (BJP)कडूनही मविआ सरकारला कोंडीत पकडण्याचा एकही प्रयत्न सोडत नाहीये. याच दरम्यान आता शिवसेनेचे 12 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा भाजप नेत्याने दावा केला आहे. भाजपच्या नेत्याने केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. (BJP leader claims 12 Shiv Sena MLA in our contact) राज्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर (Former Minister Babanrao Lonikar) यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात भाष्य करत असताना हा दावा केला आहे. बबनराव लोणीकर यांनी म्हटलं, शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात आहेत. इतकेच नाही तर राज्यात लवकरच सत्ताबदल होण्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तर बबनराव लोणीकर यांनी केलेला हा दावा शिवसेनेने खोडून काढला आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक लवकरच होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपने सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली आहे. सुभाष साबणे यांच्या समर्थनार्थ आयोजित प्रचार रॅलीत बबनराव लोणीकर यांनी हा दावा केला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे, आशिष शेलारही साबणे यांच्या प्रचारासाठी देगलूर येथे दाखल झाले आहेत. सुभाष साबणे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुभाष साबणे हे तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. बबनराव लोणीकर यांनी म्हटलं, जर महाराष्ट्रात काही बदल घडवायचा असेल तर विद्यमान सरकारमध्ये मतदारांनी भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांना विजयी करा. राज्यात चमत्कार होईल. शिवसेनेचे 12 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. देगलूरमध्ये भाजपकडून सुभाष साबणे यांना उमेदवारी नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Deglur Assembly by polls) भारतीय जनता पक्षाकडून सुभाष साबणे (BJP announced Subhash Sabane candidate for by polls) यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. सुभाष साबणे हे माजी आमदार असून त्यांनी या मतदारसंघातून रावसाहेब अंतापूरकर (Raosaheb Antapurkar) यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. देगलूर विधानसभेसाठी 30 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. सुभाष साबणे यांचा अल्प परिचय सुभाष साबणे हे शिवसेनेचे नेते. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. सुभाष साबणे हे मुखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार होते. त्यानंतर त्यांनी देगलूर येथून विधानसभा निवडणूक जिंकली. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या रावसाहेब अंतापूरकर यांनी सुभाष साबणे यांना पराभूत केलं. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेसने ही जागा पुन्हा मिळवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. तर तिकडे विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सुद्धा या जागेवर विजय मिळवण्यासाठी आपली पूर्ण तयारी केली आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मविआ सरकारला झटका दिल्यानंतर आता देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पुन्हा भाजप बाजी मारतं की काँग्रेस आपली जागा राखतं हे पाहवं लागेल. देगलूर बिलोली मतदारसंघात कोणाचं प्राबल्य? 2009 च्या निवडणुकीत काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर विजयी 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुभाष साबणे यांनी मारली बाजी 2019 मध्ये पुन्हा रावसाहेब अंतापूरकर यांनी विजय मिळवला
Published by:Sunil Desale
First published:

Tags: BJP, Nanded, Shiv sena

पुढील बातम्या