Home /News /maharashtra /

औरंगाबादेत भाजपला खिंडार, भाजपच्या माजी शहराध्यक्षांनी बांधले 'शिवबंधन'

औरंगाबादेत भाजपला खिंडार, भाजपच्या माजी शहराध्यक्षांनी बांधले 'शिवबंधन'

शिवजयंतीच्या दिवशी औरंगाबादेत भाजपला खिंडार पडले आहे.

    मुंबई,19 फेब्रुवारी: राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर राजकीय क्षेत्रातही अनेक बदल होताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये मोठ्याप्रमाणात इनकमिंग झाले होते. मात्र, मिरिटमध्ये येऊनही भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. शिवजयंतीच्या दिवशी औरंगाबादेत भाजपला खिंडार पडले आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह त्यांच्या समर्थक नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर किशनचंद तनवाणी यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले. हेही वाचा.. राधाकृष्ण विखे पाटील नव्या रस्त्याच्या शोधात...? संपर्क कार्यालयावरुन झेंडा गायब किशनचंद तनवाणी यांच्या शिवसेना प्रवेशामुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठे खिंडार पडल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या शहराध्यक्ष निवडीवरून ते काही दिवसांपासून नाराज होते. मुळचे शिवसैनिक असलेले तनवाणी यांनी काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आपल्याला डावललं जातंय असं वाटल्याने त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत 7 समर्थक नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, आमदार संजय शिरसाट, अंबादास दानवे यावेळी उपस्थित होते. हेही वाचा.. उंच किल्ल्यावरून पडून 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू, शिवजयंतीसाठी गेली होती मित्रांसोबत औरंगाबाद महापालिकेत मागील अनेक वर्षांपासून शिवसेना आणि भाजपचं वर्चस्व आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खौरे यांचा पराभव झाला आणि एमआयएमचे इम्तियाज जलील हे विजयी झाले. त्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबदमध्ये शिवसेनेची ताकद कमी झाली असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यातच विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेना वेगळी झाल्याने महापालिका निवडणुकीत कुठलाही फटका बसू नये याची काळजी शिवसेना घेत आहे. निवडणुकीआधीच आपली ताकद वाढविण्यासाठी शिवसेनेने भाजपमध्ये नाराज किशनचंद तनवाणींना आपल्याकडे वळवलं आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्याने त्याचा फायदा शिवसेनाला झाला आहे. हेही वाचा.. डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतात 36 तास मुक्काम, मोदींसोबत लंच तर या मुद्द्यांवर होणार चर्चा काहीही फरक पडणार नाही, भाजपचा दावा किशनचंद तनवाणी हे शिवसेनेत गेल्याने भाजपला काहीही फरक पडणार नाही, असा दावा भाजप शहर अध्यक्ष संजय केणेकर यांनी केला आहे. भाजप हा विशाल समुद्र आहे. आगामी महापालिका निवडणुकीत विकासासाठी जनता निश्चितपणे भाजपला साथ देईल, असा विश्वास केणेकर यांनी व्यक्त केला आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Aaurangabad, Aurangabad, Aurangabad news, BJP, Matoshri visit, Shiv sena, Udhav thackarey

    पुढील बातम्या