अमित शहानंतर मुंबईतील भाजप नेत्याचाही शरद पवारांवर हल्लाबोल, म्हणाले...

अमित शहानंतर मुंबईतील भाजप नेत्याचाही शरद पवारांवर हल्लाबोल, म्हणाले...

अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं.

  • Share this:

मुंबई, 22 सप्टेंबर : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईमधील सभेत विरोधकांवर जोरदार टीका केली. कलम 370 च्या मुद्द्यावरून अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं. त्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनीही पवारांवर शाब्दिक हल्ला केला आहे.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमितभाई शाह दोघेही येऊन जेव्हा जेव्हा प्रचाराची सुरुवात करतात तेव्हा छत्रपतींच्या या महाराष्ट्रातील निवडणुकीत भाजपच्या विजयाचेच झेंडे फडकतात. जाणत्या राजांच्या अफवांप्रमाणे 'कुछ होवो न होवो' भाजपचा मुख्यमंत्री पुन्हा होणार हे मात्र ठरले हो", असं ट्वीट करत आशिष शेलार यांनी पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

अमित शहांचं टीकास्त्र

- जवाहरलाल नेहरु यांच्या चुकीमुळेच पाकव्याप्त काश्मिरचा मुद्दा उभा राहिला

- अमित शहांचं कॉंग्रेसवर टीकास्त्र

- कलम 370 हटवणं हा भाजपसाठी राजकारणाचा विषय नव्हता

- राहुल तुम्ही तर आताच राजकारणात आलात आमच्या तीन पिढ्या काश्मिरसाठी बलिदान देण्य़ासाठी पुढे आल्य़ा

- काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे

शहांचा मुंबई दौरा

- सकाळी 11.20 वाजता मुंबई विमानतळावर दाखल

- दुपारी 12 वाजता 370 कलमासंदर्भात व्याख्यानासाठी नेस्को संकुल गोरेगाव या कार्यक्रमस्थळी आगमन

- दुपारी 1.45 च्या सुमारास नवनियुक्त मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेपियनसी रोड येथील निवासस्थानी भेट

- त्यांनतर दुपारी 2.30 च्या सुमारास राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट

- संध्याकाळी चर्चगेट येथे जय हिंद कॉलेजच्या एका कार्यक्रमात उपस्थिती

- कार्यक्रमानंतर संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर राखीव वेळ ठेवण्यात आला आहे. (आगामी निवडणुकीच्या आढावा बैठका होऊ शकतात)

- आजच्या या कार्यक्रमानुसार अमित शाह यांची शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट ठरलेली नाही.

VIDEO: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस येणार! अमित शाहांकडून मोठी घोषणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 03:37 PM IST

ताज्या बातम्या