पुण्यात भाजपची 'दादा'गिरी तर सेनेचा पत्ता कट, आठही जागांवर जाहीर केले उमेदवार

पुण्यात भाजपची 'दादा'गिरी तर सेनेचा पत्ता कट, आठही जागांवर जाहीर केले उमेदवार

भाजपने त्यांची पहिली यादी जाहीर केली असून 12 विद्यमान आमदारांचे तिकीट कापलं आहे.

  • Share this:

पुणे, 01 ऑक्टोंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून 21 ऑक्टोंबरला मतदान होणार आहे. दरम्यान, भाजपने त्यांची उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये 12 विद्यमान आमदारांचे तिकीट कापलं आहे. भाजपने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

पुण्यातील आठही जागा भाजप लढवणार असून शिवसेनेचा पत्ता कट केला आहे. महाराष्ट्र विधानसभेसाठी युतीचा फॉर्म्युला ठरला असून यात भाजपला 146, शिवसेनेला 124 तर मित्रपक्षांना 18 जागा सोडण्यात य़ेणार आहेत. पुण्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघाची उमेदवारी देऊन पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याचा प्लॅन भाजपने आखला आहे.

पुण्यातील विधानसभा मतदारसंघ आणि भाजपचे उमेदवार

वडगाव शेरी - जगदीश मुळीक

शिवाजीनगर - सिद्धार्थ पद्माकर शिरोळे

कसबा पेठ - मुक्ता टिळक

हडपसर - योगेश टिळेकर

पुणे कान्टोन्मेंट सुनिल कांबळे

कोथरूड - चंद्रकांत दादा पाटील

पर्वती - माधुरी मिसाळ

ख़डकवासला - भिमराव तपकीर

याआधी काँग्रेसने रविवारी 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामुळे आता भाजप कोणत्या उमेदवारांना रिंगणात उतरवणार याची चर्चा सुरू झाली होती. भाजपने 90 टक्के उमेदवारांची नावं निश्चित केली असल्याची माहिती आहे.

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर ट्रकने घेतला पेट; आगीची भीषणता दाखवणारा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2019 01:44 PM IST

ताज्या बातम्या