लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र, मुख्यमंत्र्यांकडून जाहीर

लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र, मुख्यमंत्र्यांकडून जाहीर

भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढले असते तर दोनही पक्षांना त्याचा फटका बसला असता. याची जाणीव दोनही पक्षांना होती.

  • Share this:

मुंबई 18 फेब्रुवारी : स्वबळाचा निर्धार, पटक देंगेचा इशारा, आम्हीच मोठा भाऊची गर्जना असे इशारे आणि घोषणा गेली चार वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवल्या. सत्तेत राहुनही शिवसेनेने कायम विरोधी पक्षाची भूमिका निभावली. सामनातून शिवसेनेने जोरदार प्रहार केलेत. तर भाजपनेही शिवसेनेकडे अखेर दुर्लक्ष केलं. अशा वातावरणात महाराष्ट्रात चौरंगी लढत होणार अशी शक्यता असताना अखेर भाजप आणि शिवसेनेचं जमलं आहे. 2019 ची लोकसभा आणि त्यानंतरची विधानसभा निवडणूक दोनही पक्ष एकत्र लढणार आहेत.

LIVE UPDATE:

- ज्या ठिकाणी लोकांची मान्यता असेल तिथेच नाणार होणार - मुख्यमंत्री

- नाणारचा मुद्दा शिवेसेनं मांडला - मुख्यमंत्री

- कर्जमाफीसाठी तातडीने आढावा घेण्यास सुरुवात - मुख्यमंत्री

- कर्जमाफीचा फायदा सर्व योग्य लोकांना मिळावा यासाठी प्रयत्न - मुख्यमंत्री

- राज्यातल्या शेतकऱ्यांचा विचार झाला पाहिजे असा उद्धवजींचा आग्रह - मुख्यमंत्री

- येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजप-शिवसेना एकत्र लढणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

- शिवसेना आणि भाजप युतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेला सुरुवात

- किरीट सोमय्या यांचा युतीसाठी आयोजित पत्रकार परिषदेतून काढता पाय

- अमित शहा आणि उद्धव ठाकरे एकाच कारमधून पत्रकार परिषद घेण्यासाठी रवाना

- मातोश्रीवर युतीसाठीची बैठक संपली

- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या चौघांत बैठक सुरू

- मातोश्रीच्या पहिल्या मजल्यावर बैठकीला सुरूवात

- शिवसेना आणि भाजपमध्ये होत असलेल्या या बैठकीनंतर ब्लूसी हॉटेलवर पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.

- बैठकीसाठी शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, संजय राउत, मनोहर जोशी, अनिल देसाई, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे तर भाजपकडून अमित शाह, देवेंद्र फडणवीस, प्रकाश जावडेकर, पियूष गोयल आणि रावसाहेब दानवे उपस्थित

- शिवसेना नेते आणि भाजप नेत्यांमध्ये युतीसंदर्भातल्या चर्चेला सुरुवात

- अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील मातोश्रीवर दाखल

- भाजप अध्यक्ष अमित शहांचा ताफा मातोश्रीवर दाखल

- युतीसंदर्भात चर्चा करण्यासाठी भाजप नेत्यांनी आणि शिवसेना नेत्यांची मातोश्रीवर बैठक

शिवसेनेने स्वबळाची आणि भाजपने मोदींच्या करिष्म्यावर निवडणूक जिंकण्याच्या घोषणा केल्या तरीही दोघांनाही वस्तुस्थितीची जाणीव होती. परिस्थिती ओळखून भाजपने शिवसेनेला युतीची टाळी फार पूर्वीच दिली होती. तर शिवसेनेने भाजपला ताटकळत ठेवलं होतं. शिवसेनेची ही रणणीती जास्तीत जास्त पदरात पाडून घेण्यासाठीच होती हे आता स्पष्ट झालंय.

2014 च्या निवडणूकीत भाजपने 26 तर शिवसेनेने 22 जागा लढवल्या होत्या. लढवलेल्या 26 पैकी भाजपने 23 तर शिवसेनेने 22 पैकी 18 जागा जिंकल्या होत्या. महाराष्ट्रातल्या एकूण 48 जागांपैकी भाजप आणि शिवसेनेने तब्बल 41 जागा जिंकल्या होत्या. विरोधकांच्या वाट्याला फक्त 7 जागा आल्या होत्या.

भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढले असते तर दोनही पक्षांना त्याचा फटका बसला असता. याची जाणीव दोनही पक्षांना होती. मात्र विधानसभा निवडणुकीच्यावेळी कटुता निर्माण झाल्याने शिवसेना दुखावली होती. 25 वर्ष मोठा भाऊ म्हणून भूमिका घेतल्यानंतर नमतं घेणं शिवसेनेला कठीण गेलं.

शिवसेना बदललेली परिस्थिती स्वीकारण्यास तयार नव्हती. तर लोकसभेतल्या मोदी लाटेत ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर भाजपच्या डोक्यात हवा गेली होती. मात्र बदलती परिस्थिती लक्षात घेऊन युतीचा निर्णय झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसणार आहे.

VIDEO : शरद पवारांना 'शकुनी मामा'म्हणता, तुमची औकात काय? - अजित पवार

First published: February 18, 2019, 3:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading