निकालानंतरची सगळ्यात मोठी बातमी, भाजप करणार उद्या सत्ता स्थापनेचा दावा!

निकालानंतरची सगळ्यात मोठी बातमी, भाजप करणार उद्या सत्ता स्थापनेचा दावा!

भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील हे राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेची माहिती देणार असल्याचं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांना सांगितलं आहे.

  • Share this:

मुंबई, 06 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात सुरू असलेला सत्ता स्थापनेचा वाद आता थांबणार असल्याची चिन्ह आहेत. कारण उद्या भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील हे राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेची माहिती देणार असल्याचं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांना सांगितलं आहे. काहीही झालं तरी सत्ता ही महायुतीचीच येणार असल्याचा विश्वास यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. तर सत्ता स्थापनेची माहिती देण्यासाठी ते उद्या राज्यपालांनाही भेटणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे गुरुवारी सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार असल्याचं दिसतं आहे.

सलग दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. भाजप-शिवसेना सत्तासंघर्षावर पुन्हा एकदा आज चर्चा करण्यात आली आहे.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या मुद्द्यावर आज मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांची बैठक घेतली. सरकारनं सरसकट प्रत्येक शेतकऱ्याला 25 हजारांची मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशानं आपण बैठकीला उपस्थित असं सेना नेत्यांनी आवर्जून सांगण्यात आलं.

इतर बातम्या - सुजय विखेंना सुरक्षा देणाऱ्या पोलीस वाहनाचा भीषण अपघात, 150 फूट दरीत कोसळली कार

बैठकीनंतर काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार

- राज्याच्या अवकाळी पावसासंदर्भात चर्चा

- शेतकऱ्यांच्या संकटसमयी योग्य स्तळावर मदत व्हावी यासाठी पाठपुरावा करण्याचे आदेश

- शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी चर्चा

- 31 डिसेंबरपर्यंत नव्या प्रदेशाध्यक्षाच्या निवडीवर चर्चा

- शिवसेनेशिवाय दुसरा विचार नाही

- कोणत्याही क्षणी तुम्हाल गोड बातमी येऊ शकते

- सरकार ये महायुतीचेच होणार

- उद्या राज्यपालांना भेटणार

- मुख्यमंत्र्यांऐवजी चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार राज्यपालांना भेटणार

इतर बातम्या - 45 वर्षाच्या भाजप नेत्याचं तिसरं लग्न, 18 वर्ष लहान तरुणीशी केला विवाह

राज्यातला सत्तासंघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचलाय. सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेची मुदत 8 नोव्हेंबरच्या रात्री संपणार आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस सत्तास्थापनेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक उद्या गुरुवारी (7 नोव्हेंबर) बोलावली आहे. शिवसेना भवनात सकाळी 11.30 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे हे सर्व आमदारांची मतं जाणून घेणार आहेत. त्यानंतर शिवसेनेचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. भाजपने योग्य वाटा दिला नाही तर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जायचं का असा शिवसेनेसमोर महत्त्वाचा प्रश्न आहे. शेवटच्या क्षणापर्यंत भाजपवर दबाव आणून शक्य तेवढं जास्त मिळविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.

राज्यात गावपातळीवर शिवसेनेचा मुकाबला हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी असून त्यांच्यासोबत सत्तेत जाणं परवडणारं आहे का याबद्दलची मतं आमदारांकडून जाणून घेतली जाणार आहेत. त्याचबरोबर त्यांची वेगळी मतंही उद्धव ठाकरे ऐकून घेणार असून त्यानंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

इतर बातम्या - Facebook वर झालेल्या वादात दोन भावांना चाकूने भोसकलं, एकाचा मृत्यू तर दुसरा...

First published: November 6, 2019, 5:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading