भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी वाटले पैसे, संवादाची क्लिप झाली व्हायरल

भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी आणि शिवसेना निरीक्षक जवांदे यांच्यात पैशांच्या वाटपासंदर्भातील निवडणूक काळात भ्रमणध्वनीवर झालेल्या संवादाची क्लिप व्हायरल झाली आहे. निवडणुकीत पैसे वाटप झाले आणि पैशांसाठी आपापसात वादही झालेत, असे क्लिपमुळे स्पष्ट होत आहे.

News18 Lokmat | Updated On: May 1, 2019 04:59 PM IST

भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी वाटले पैसे, संवादाची क्लिप झाली व्हायरल

संजय शेंडे, (प्रतिनिधी)

अमरावती, 1 मे- भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी आणि शिवसेना निरीक्षक जवांदे यांच्यात  पैशांच्या वाटपासंदर्भातील निवडणूक काळात भ्रमणध्वनीवर झालेल्या संवादाची क्लिप व्हायरल झाली आहे. निवडणुकीत पैसे वाटप झाले आणि पैशांसाठी आपापसात वादही झालेत, असे क्लिपमुळे स्पष्ट होत आहे.

नेमके काय आहे क्लिपमध्ये?

क्लिपमध्ये सूर्यवंशी हे अतिशय शांत सुरात बोलायला सुरुवात करतात. 'जास्तीत जास्त बूथ प्रमुख आपले आहेत. शिवसेनेकडे बुथ प्रमुख नाहीत', असे सुर्यवंशी यांनी म्हणताच समोरून जावंदे नावाचा व्यक्ती म्हणतो, 'साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे निम्मे भाजपला द्या आणि निम्मे शिवसेनेला द्या. भाजपचे वाटताना शिवसेनेवाले समोर राहतील आणि काही शिवसेनेचे वाटताना भाजपवाले समोर राहतील. जेणेकरुन दोघांनाही पोहोचले पाहिजे हे आपले नियोजन आहे. त्याचपद्धतीने आज काम केले साहेब'. यानंतर सूर्यवंशी आणि जावंदे यांच्यात अडीच हजार रुपये बुथप्रमुखासह शक्तिकेंद्र प्रमुखांच्या वार्तालापाबाबतही चर्चा आहे.  आमच्याकडे भाजपमध्ये शक्तिकेंद्र प्रमुखाला वैयक्तिक पैसे दिले जातात. आज आपण वैयक्तिक पैसे दिले नाहीत, असे सुर्यवंशी म्हणतात. यावर जावंदे म्हणतात 'शक्तिकेंद्र आता निवडणुकीत अस्तित्वात आले. 'यावर सुर्यवंशी म्हणतात, 'सुधीर मुनगंटीवार अध्यक्ष होते तेव्हापासून शक्ती केंद्र आहेत'. यावर जावंदे म्हणतात, 'मी पण भाजपचा जिल्हाध्यक्ष होतो असे काही नव्हते'. यावर सुर्यवंशी म्हणतात 'तुमचा अभ्यास कमी पडतो सोडा. 'वाटून टाकले आता पैसे आता काय राहिला प्रश्न मुळात इतके सांगा', असा प्रश्न जावंदे विचारतात.

तेव्हा सुर्यवंशी म्हणतात, ठीक आहे आम्हाला आमच्या संघ परिवाराकडून फिडबॅक आला. ते आमच्यात बोलत नाही आणि आम्हीही त्यांच्यात बोलत नाही. पण मेळघाट हा ख्रिश्चन मिशनऱ्यांचा पट्टा आहे. आता फिडबॅक असा आला की जे अडीच हजार रुपये तुम्हाला दिले हे अपुरे पडत आहेत. 5 हजार अपुरे पडतात. हे मी पालकमंत्र्यांही कळवले. विषय असा आहे आपले जे 5 हजार रुपये आहेत. हे खालपर्यंत गेले नाहीत. मी आता साळवींना बोललो. हा फिडबॅक आमच्यासाठी महत्वाचा असतो. त्यांना काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. त्यांना आपण विजयी व्हावे असे वाटते.सुर्यवंशी यांचे लांबलचक म्हणणे ऐकल्यावर जावंदे म्हणतात,' साहेब दोन्ही कडून 100 टक्के काम झालेले नाही. मी फिडबॅक घेतो आहे. भाजप आणि सेनेचेही १०० टक्के काम नाही आहे. मी आजही राणीगाव सर्कलमध्ये आहे आणि तुमचा धारणी तालुका अध्यक्ष आप्पा घरी जाऊन झोपला आहे. दुर्दैवी बाब म्हणजे, मी सकाळी 10 वाजता त्यांच्या घरी सगळ्या बुथचे पैसे पोहोचवून आलो. ते वाटायला लोक दुपारी साडेतीनला निघत असतील तर या टाईम गॅपला टाईम पास म्हणायचे का? आप्पानी झिरो काम केले आहे. माझा हा आरोप आहे आणि मी आपल्या भाजपच्या कार्यालयाकडे सांगणार आहे.

Loading...

पाणी अति डोक्यावरुन गेले आहे साहेब, तुम्ही त्यांचे अतिशय लाड केलेत इतके कोणी करत नाही. 15 दिवसात तो 4 ते 5 वेळा अमरावतीला गेला आहे. त्याने काम केले नाही, आम्ही त्याची एक रुपयाचीही तक्रार केली नाही साहेब, असे जावंदे म्हणताच सुर्यवंशी यांचा बोलण्याचा सूर बदलतो. सुर्यवंशी अतिशय चिडून म्हणतात, आम्ही तुमचे काही नोकर नाही, आमची तक्रार करायची नाही. लाड पुरवतो, गीड पुरवतो शब्द नीट वापरा जरा. नोकर नाही हाकलून देईन तिथून मी उद्याच्या उद्या ,एक बूथ काम नाही करणार. तुमच्या बापाच्या जीवावर करतो का आम्ही. आम्हाला धमकवायला आले का तिथे. एक मिनिटात हाकलून देईन, एक काम करणार नाही तिथे कुणी. तुम्हाला अक्कल आहे का काही. त्या राज ठाकरेंनी तिथे हरिसालचा पोरगा दाखवला सभेमध्ये त्याच्यासाठी आम्हाला दोन दिवस घालवावे लागले अक्कल आहे का, तुम्हाला काही. 'you are not my boss' ऐका मिनिटांत धारणी सोडा आता, अशा शब्दात सुर्यवंशी हे जावंदे यांना दम देत असल्याचे या ऑडियो क्लिपमध्ये ऐकायला येत आहे. जावंदे ही व्यक्ती अडसूळांनी निवडणूक नियोजनासाठी मुंबईवरुन आणलेल्या टीमचे सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे. सुर्यवंशी आणि जावंदे यांच्या संवादाची ही क्लिप प्रचंड व्हायरल होत आहे. निवडणुकीत पैशांचा वाटप झाले आणि पैशांसाठी आपसात वादही झालेत, असे क्लिपमुळे स्पष्ट होत आहे.


VIDEO : 'लेक आणि नातू हरणार याचं पवारांना दु:ख', चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 04:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...