• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • ...जेव्हा बैठकीत राजकीय कार्यकर्त्यावर भडकलेले जिल्हाधिकारी नंतर गांधीगिरी दाखवतात!

...जेव्हा बैठकीत राजकीय कार्यकर्त्यावर भडकलेले जिल्हाधिकारी नंतर गांधीगिरी दाखवतात!

भाजपच्या (BJP) वतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई त्यांना निवेदनही देण्यात आले.

  • Share this:
कोल्हापूर, 31 मार्च : पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा आणि सांगली जिल्ह्यात कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या वाढत असतानाच कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur District) मात्र ही संख्या अजूनही आटोक्यात आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे 81 नवे रुग्ण सापडले आहेत. मात्र राज्य सरकारने जी नियमावली जाहीर केली आहे त्या नियमावलीनुसार अनेक निर्बंध जिल्ह्यात लादण्यात आले आहेत. नव्या नियमावलीनुसार रात्री 8 नंतर अनेक दुकानं , आस्थापने बंद केली जात आहेत. पण फेरीवाले, कपड्याची दुकान, किराणा दुकान सुरू ठेवावीत अशी मागणी घेऊन भाजपचं शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांच्या भेटीला आले होते. या वेळी भाजपच्या (BJP) वतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई त्यांना निवेदनही देण्यात आले. जिल्हाधिकारी का भडकले? फळविक्रेते, हातगाडीवाले, कापड दुकानदार आपलं म्हणणं मांडत होते. त्याचवेळी भाजपच्या एका पदाधिकाऱ्यांन आपलं म्हणणं मांडत असताना कोल्हापूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या कमी आहे त्यामुळे थोडीफार सूट द्यावी, असं सांगण्याचा प्रयत्न करताच जिल्हाधिकारी दौलत देसाई चांगलेच भडकले. मात्र गांधीगिरी पद्धतीने त्यांनी मी तुमच्या पाया पडतो...तुम्ही खाली बसा... सुदैवानं आता कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना आटोक्यात आहे... मग संख्या वाढण्याची वाट आपण पहायची का किंवा वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करूयात का? असा प्रतिसवाल त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांला विचारला. त्यानंतर भाजपचा कार्यकर्ता खुर्चीवर खाली बसला. हेही वाचा - भाजपनं Bengal जिंकल्यास कोण होणार मुख्यमंत्री? Dilip Ghosh यांनी दिले संकेत एकंदरीतच काय तर कडक निर्बंधांमुळे हातावर पोट असणाऱ्या कामगारांचे हाल होत आहेत आणि हे सांगण्याचा आणि हे लॉकडाऊन टाळण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे, असं म्हणत भाजपचं शिष्टमंडळाला भेटीला गेलं होतं. पण जिल्हा प्रशासन पूर्णपणे नियंत्रणासाठी सक्षम असल्याचंही यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितलं. सध्याच्या काळात तरी जिल्ह्याच्या कुठल्याही सीमा बंद केल्या जाणार नसल्याचं स्पष्ट करत त्यांनी जर कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली तर अजूनही पाचशे बेडची तात्काळ तयारी जिल्हा प्रशासन करू शकतं असंही न्यूज 18 लोकमतशी बोलताना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केलं. तसंच कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर ग्रामीण भागांमध्ये ग्रामसमित्या तयार केल्या जातील असेही जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले. दरम्यान, कोल्हापूर शहराचा विचार करता दुपारच्या काळात कडकडीत ऊन असल्यामुळे दुपारी 12 ते पाच रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे, तर मास्क असेल किंवा सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग या सगळ्यांचही पालन कोल्हापूरकर तंतोतंत करतानाचे चित्र सध्या जिल्ह्यात आहे.
Published by:Akshay Shitole
First published: