शिवसेनेसोबत सत्तासंघर्ष सुरू असतानाच अमित शहांनी भाजप नेत्यांना पाठवला 'हा' संदेश

शिवसेनेसोबत सत्तासंघर्ष सुरू असतानाच अमित शहांनी भाजप नेत्यांना पाठवला 'हा' संदेश

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना संदेश पाठवला आहे.

  • Share this:

मुंबई, 1 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. निवडणुकीत युतीत लढणारे शिवसेना आणि भाजप निकालानंतर मात्र एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. कोणाला कोणतं खातं मिळणार आणि मुख्यमंत्री कोणाचा होणार, यावरून दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेत चाललेला संघर्ष हा मुख्यमंत्रिपदासाठी नसून चांगली खाती मिळावीत यासाठी असल्याची माहिती आहे. नगर विकास, गृह यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांवर शिवसेनेनं दावा सांगितला आहे. म्हणूनच भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हा तिढा सुटत नसतानाच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना संदेश पाठवला आहे.

सत्ता स्थापनेचं गणित सोडवण्यासाठी अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर येणार होते. मात्र अचानक शहा यांचा हा दौरा रद्द झाला आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी राज्य स्तरावर यातून मार्ग काढावा, असं अमित शहांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेला कोणता नवा प्रस्ताव देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

'लिहून घ्या, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार'

एकीकडे सत्ता वाटपाबाबत भाजप शिवसेनेत बोलणी पूर्ण झाली नसतानाच संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 'लिहून घ्या, मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार आहे' असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तावाटपावरून भाजप-शिवसेनेत वाद सुरू असतानाच एकीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावरही संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे.

काहीही झालं तरी मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. लोकसभा निवडणुकांच्या आधी युतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्यामुळे त्याच नियमांनुसार आताही जागेची वाटणी व्हावी अशी शिवसेनेची भूमिका आहे असं संजय राऊत म्हणाले. तर तसं नाही झालं तर आम्ही बहुमताने सरकार स्थापन करू असंही राऊतांनी स्पष्ट केलं. स्थिर सरकारसाठी शिवसेना बहुमत सिद्ध करेल आणि महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल अशी स्पष्ट भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे.

VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2019 11:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading