विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर होताच भाजपचे चाणक्य सरसावले, तातडीची बैठक

भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 21, 2019 03:39 PM IST

विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर होताच भाजपचे चाणक्य सरसावले, तातडीची बैठक

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच भाजप मुख्यालयात बैठक बोलावण्यात आली आहे. भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक होत आहे. या बैठकीला भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर, महासचिव अरुण सिंह आणि इतर नेते उपस्थित आहेत.

आर्थिक मंदीवरील विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी रणनीती तयार करण्यावर अमित शहा यांच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. देशाची आर्थिक स्थिती बिकट झाल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होऊ शकते. विधानसभा निवडणुकीत या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाल्यास त्यांना काय उत्तर द्यायचं, याबाबत भाजपच्या बैठकीत विचारमंथन करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commision of India) पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. राज्यात ऑक्टोबर 2014 विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. तर निकाल 19 ऑक्टोबर रोजी जाहीर झाले होते.

Loading...

288 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

अधिसूचना - 27 सप्टेंबर.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख - 4 ऑक्टोबर.

उमेदवारी अर्ज छाननी - 5 ऑक्टोबर.

उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख - 7 ऑक्टोबर

2014 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात कुणाला किती जागा?

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेलाही समाधानकारक जागा मिळाल्या होत्या.

या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावली. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

काय आहे हरियाणातील स्थिती?

हरियाणामध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. हरियाणात मागील निवडणुकीत 90 पैकी 47 जागांवर भाजपने विजय मिळवला होता आणि मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar)यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले होते.

VIDEO: विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 03:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...