शरद पवारांच्या साताऱ्यातील 'त्या' वादळी सभेबाबत भाजपचा गंभीर आरोप

शरद पवार यांच्या बहुचर्चित सभेबाबत भाजपने गंभीर आरोप केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 19, 2019 06:47 PM IST

शरद पवारांच्या साताऱ्यातील 'त्या' वादळी सभेबाबत भाजपचा गंभीर आरोप

मुंबई, 19 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यभर झंझावाती सभा घेतल्या. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात शरद पवार यांनी सातारा इथं घेतलेल्या सभेची तर राज्यभर मोठी चर्चा झाली. कारण या सभेत शरद पवार यांनी कोसळणारा पाऊस अंगावर घेत आपण अजूनही खंबीर असल्याचं दाखवून दिलं. पण शरद पवार यांच्या याच बहुचर्चित सभेबाबत भाजपने गंभीर आरोप केला आहे.

'शरद पवार हे भर पावसात भाषण देत असताना लोक उभी होती, कारण राष्ट्रवादीने त्यांच्यावर पैशाचा पाऊस पाडला होता. ही बघा कालच्या भ्रष्टवादीच्या सभेची पोल खोल. कितीही भावनिक राजकारण केलं तरी शेवटी तुमचं पितळ उघडं पडणारच,' असं म्हणत भाजपकडून सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

निवडणूक प्रचाराची सांगता होत असताना भाजपने राष्ट्रवादीवर हा गंभीर आरोप केला आहे. भाजपच्या या आरोपाला आता राष्ट्रवादी कसं उत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हा व्हिडिओ भाजपच्या अधिकृत अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्याच्या सत्यतेची 'न्यूज 18 लोकमत' पुष्टी करत नाही.

Loading...

दरम्यान, शरद पवार यांची सातारा इथं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसाठी सभा पार पडली. या सभेवेळी तिथं जोरदार पावसाने हजेरी लावली. पण पाऊस कोसळत असतानाही शरद पवार यांनी आपलं भाषण सुरुच ठेवलं. शरद पवारांच्या या कृतीने सभेला उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या उर्जेसाठी ओळखले जातात. वयाच्या 79 व्या वर्षीही ते राज्यभर करत असलेल्या दौऱ्यामुळे अनेकजण आश्चर्यही व्यक्त करतात. त्यातच आता सातारा इथल्या शरद पवार यांनी पाऊस सुरू असतानाही केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा होत आहे.

पाऊस नाही शरद पवार बरसले, भरपावसातलं UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2019 06:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...