रावसाहेब दानवेंचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात?

रावसाहेब दानवेंचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात?

. रावसाहेब दानवे यांची प्रदेशाध्यक्षपदावरुन उचलबांगडी करण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी दोन नावाची चर्चाही सुरू झाली आहे.

  • Share this:

16 आॅगस्ट : या ना त्या विधानामुळे वादात अडकणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आता चांगलेच संकटात सापडले आहे. रावसाहेब दानवे यांची प्रदेशाध्यक्षपदावरुन उचलबांगडी करण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी दोन नावाची चर्चाही सुरू झाली आहे.

शेतकऱ्यांना 'साल्या' म्हणं, "लक्ष्मी आली तर स्विकारा" असं भर जाहीर सभेत आवाहन करणे रावसाहेब दानवे आपल्या विधानामुळे पुरते अडचणीत सापडले होते. त्यांच्या विधानामुळे भाजपची चांगलीच नाचक्की झाली होती.

आता भाजपने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवण्याची तयारी केलीये. भाजप कार्यकार्यरीणीची उद्या बैठक होणार आहे. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष म्हणून रावसाहेब दानवे यांच्या जागी पर्याय देण्यावर विचार होणार आहे. जर दानवे यांची उचलबांगडी झाली तर त्यांच्या जागी कोण असेल याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2017 07:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading