सापाने दंश केल्यानंतर मुलीला रुग्णालयाऐवजी नेले बाबाकडे, उपचाराअभावी सोडले प्राण

सापाने दंश केल्यानंतर मुलीला रुग्णालयाऐवजी नेले बाबाकडे, उपचाराअभावी सोडले प्राण

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वनकोठे गावात अंधश्रद्धेमुळे एका 17 वर्षीय युवतीला आपला जीव गमवावा लागला आहे.

  • Share this:

जळगाव, 23 फेब्रुवारी : पुरोगामी महाराष्ट्रात आज ही अंधश्रद्धेला खतपाणी दिले जात असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं अजून जळगाव (Jalgaon)जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातल्या कासोदा नजिक असलेल्या वन कोठे गावातील शारदा रामचंद्र भील या 17 वर्षीय युवतीचा अंधश्रद्धेने बळी घेतला आहे.

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वनकोठे गावात अंधश्रद्धेमुळे एका 17 वर्षीय युवतीला आपला जीव गमवावा लागला आहे. एरंडोल तालुक्यातल्या कासोदा गावानजीक असलेल्या वनकोठे गावात आदिवासी कुटुंबातील  शारदा रामचंद्र भिल असे या युवतीचे नाव असून घर सावरत असताना अचानक सर्पा ने शारदाला दंश केला होता. मात्र, कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात न नेता देव ठाण्यावर नेत अखेर शारदाचा मृत्यू झाला.

‘एम्स’ म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष नाही, सेनेनं भाजपला फटकारले

शारदा ही अकरावीत शिक्षण घेत होती घर सारवत असताना अचानक सर्पाने शारदाला दंश केला. काहीतरी चावल्याने शारदाने आरडाओरडा केला. त्यामुळे आजूबाजूचे नागरिक धावून आले. काहीजणांनी सर्प चावलेल्या भागावर विष शरीरात पसरून नाही म्हणून सर्प दंश केलेल्या दोन ठिकाणी पट्टीने घट्ट बांधले. मात्र शारदाच्या पालकांनी शारदाला उपचारासाठी दवाखान्यात न नेता अमळनेर तालुक्यातील कान्हेरे फाफोरे येथे एका बाबांच्या ठाण्यावर सर्पाचे विष उतरवण्यासाठी नेले. तिथे शारदाला दिवसभर ठेवल्यानंतर उपयोग होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या पालकांनी तिला वनकोठे येथे परत घरी आणले.

धक्कादायक, लातूरमधील एकाच वसतीगृहात 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

परंतु, तोपर्यंत शारदाची शुद्ध हरपली होती. गावातील सरपंच व सुज्ञ नागरिकांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी शारदाला एरंडोल ग्रामीण रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी शारदाला मृत घोषित केले. खरंतर पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय अशी ही घटना असून आजही समाजात अंधश्रद्धेला खत पाणी दिल्या जात आहे, हे दुर्दैव म्हणावे लागेल.

Published by: sachin Salve
First published: February 23, 2021, 10:21 AM IST
Tags:

ताज्या बातम्या