ठाणे, 06 जानेवारी : कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या (coronavirus new strain) आढळून आल्यानंतर आता बर्ड फ्लूच्या घटना (bird flu) भारतात (India) चिंतेच्या ठरत आहेत. पंजाब, राजस्थान, झारखंड पाठोपाठात ठाण्यात सुद्धा खळबळजनक घटना घडली आहे.
ठाण्यातील (Thane) रस्त्यावर अचानक अनेक पक्षी मृतावस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. रस्त्यावर सकाळपासून पक्षी मृतावस्थेत आढळून आले आहे. या सर्व पक्ष्यांना ठाणे वनविभागाने (Thane Forest Department) ताब्यात घेतले आहे.
पंजाब, राजस्थान, झारखंड आणि मध्य प्रदेश या चार राज्यांमध्ये पक्षी मोठ्या प्रमाणात मरून पडलेले सापडत आहेत. पंजाब, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये बर्ड फ्लूबाबत अलर्टही (bird flu alert) जारी करण्यात आला ही घटना ताजी असताना ठाण्यातील विजय गार्डन्स या सोसायटीत अनेक पक्षी मृतावस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. बगळा जातीतील हे पक्षी सकाळपासून रस्त्यावर मृतावस्थेत पडून होते. या पक्षांना नेमके काय झाले याची माहिती अद्याप समोर आली नाही. परंतु, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कॅनरा बँकेतून पैसे घेण्यासाठी पोहोचला मृत व्यक्ती, 3 तास थांबला आणि....
रस्त्याच्या बाजूला मृत पक्षांचा खच पडला आहे. पोंड हेरॉन, म्हणजे पाण बगळा जातीचे हे पक्षी आहे. एकूण 14 पक्षांचा मृत्यू झाला आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं पक्षी मृतावस्थेत आढळून आल्यामुळे चिंतेचं वातावरण पसरले होते.
स्थानिकांनी या घटनेबद्दल पक्षी प्रेमी, पर्यावरण प्रेमी यांना बोलावून माहिती दिली. त्यानंतर ठाणे पालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी केल्यानंतर सर्व मृत पक्षांना अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. या सर्व पक्षांची वैद्यकीय तपासणी केली जाईल, त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.
हिमाचल प्रदेशात 1000 पक्ष्यांचा मृत्यू
दरम्यान, मध्य प्रदेश, राजस्थान नंतर हिमाचल प्रदेशात 1000 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. या तीन राज्यांमध्ये अचानक मोठ्या संख्येनं कावळे आणि इतर पक्षी मरायला लागल्यानं चिंता व्यक्त केली आहे. या पक्षांचे नमुने तपासणीसाठी पाठवल्यानंतर बर्ड फ्लूमुळे हा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे आरोग्य आणि प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. महाराष्ट्राला अद्याप बर्ड फ्लूचा तितकासा धोका दिसत नसला तरी उत्तर भारतात मात्र ही चिंतेची बाब आहे.
फक्त इंजेक्शन नाही तर नाकावाटेही दिली जाणार स्वदेशी कोरोना लस; नागपुरात संशोधन
राजस्थानमध्ये तीन जिल्ह्यांमध्ये साधारण 170 हून अधिक पक्षांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी समोर आली त्यानंतर मध्य प्रदेशात 50 हून अधिक कावळ्यांचा अचानक मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली होती. तर आता हिमाचलमध्ये मोठ्या संख्येनं पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. या मृत पक्षांच्या शरीरात H5N8 नावाचा व्हायरस सापडला आहे. या व्हायरसचा संसर्ग एका पक्ष्यांकडून दुसऱ्या पक्ष्याला होतो. सध्या हा संसर्ग फक्त कावळ्यांपूरताच मर्यादीत असल्याचं तपासातून समोर आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.