नवी दिल्ली, 14 जानेवारी : तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाचे चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांचं निधन झालं. या हेलिकॉप्टर अपघात प्रकरणाची हवाई दलाच्या मार्फत चौकशी करण्यात आली आहे. हेलिकॉप्टरच्या बॉक्समधील संवाद आणि वस्तुस्थितीनुसार पुरावे तपासण्यात आले. हेलिकॉप्टरमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाला नव्हता, खराब हवामानामुळेच हा अपघात झाल्याचा निष्कर्ष कोर्ट ऑफ एन्क्वायरीने (PRELIMINARY FINDINGS OF COI) काढला आहे.
बिपीन रावत (CDS bipin Rawat) यांचे 8 डिसेंबर 21 रोजी हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालं. त्यांच्यासह त्यांची पत्नी मधुलिका आणि 11 अधिकारी आणि जवान यांचं निधन झालं. धुक्यामुळे ही दुर्घटना झाल्याचं म्हटलं जात होतं. या प्रकरणी वायुदलाने दुर्घटनेच्या तपासासाठी कोर्ट ऑफ एन्क्वायरीचे आदेश दिले होते.
Tri-Services Court of Inquiry into the Mi-17 V5 accident on 08 Dec 21 (which killed CDS Rawat & others) in its preliminary findings analysed Flight Data Recorder and Cockpit Voice Recorder; has ruled out mechanical failure, sabotage or negligence as a cause of the accident: IAF
— ANI (@ANI) January 14, 2022
08 डिसेंबर 21 रोजी झालेल्या Mi-17 V5 अपघाताच्या चौकशीच्या ट्राय-सर्व्हिसेस कोर्टाने आपले प्राथमिक निष्कर्ष सादर केले आहेत. चौकशी पथकाने फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरचे विश्लेषण केले आहे. यामध्ये अपघाताचे संभाव्य कारण निश्चित करण्यासाठी सर्व उपलब्ध साक्षीदारांची चौकशी पूर्ण झाली आहे. हेलिकॉप्टरमध्ये कोणत्याही प्रकारचे यांत्रिक बिघाड, तोडफोड किंवा निष्काळजीपणा हे अपघाताचे कारण नाही, असं कोर्ट ऑफ इन्क्वायरीने स्पष्ट केले आहे.
तसंच, खोऱ्यातील हवामानात अनपेक्षित बदल झाल्यामुळे ढगांनी प्रवेश केल्याने ही दुर्घटना घडली. यामुळे वैमानिकाची अवकाशीय दिशाभूल झाली ज्यामुळे भूप्रदेशात नियंत्रित उड्डाण झाले. त्याच्या निष्कर्षांवर आधारित, कोर्ट ऑफ इन्क्वायरीने काही शिफारसी केल्या आहेत, असंही सांगण्यात आले आहे.
काय घडलं नेमकं?
सीडीएस बिपीन रावत हे आपल्या पत्नीसोबत एका कार्यक्रमासाठी 8 डिसेंबरला तमिळनाडूला गेले होते. वेलिंग्टन येथे आर्म्ड फोर्सेजचं कॉलेज आहे. जेथे सीडीएस बिपीन रावत यांचं लेक्चर होतं. तेथून ते हेलिकॉप्टरने कुन्नूर येथे येत असताना कुन्नूर येथे त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. कुन्नूर येथून बिपीन रावत हे दिल्लीला जाणार होते. मात्र, कुन्नूर येथे पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. या अपघातात रावत यांच्यासह 11 जणांचा मृत्यू झाला.
पंतप्रधान मोदींनी केली होती रावत यांची CDS पदी नियुक्ती!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2019 च्या स्वातंत्र्यदिनादिवशी सीडीएस या पदाबाबत घोषणा केली होती. लष्कर, वायुदल आणि नौदल या तिन्ही दलांचे प्रमुख (Chief of Defence Staff) असे हे पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. यानंतर 2020 च्या जानेवारीमध्ये जनरल बिपीन रावत यांनी देशाचे पहिले सीडीएस (First CDS of country) म्हणून कार्यभार स्वीकारला होता. रावत यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय सैन्यदलांनी बरेच महत्त्वपूर्ण मिशन्स पार पाडले. यामध्ये पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट एअर स्ट्राईक (Achievements of Bipin Rawat) अशा बऱ्याच मोहिमा सांगता येतील. रावत यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.