वसई, 15 डिसेंबर : वसईच्या आकटाण गावातील चार रस्त्यावर पुन्हा एकदा भीषण अपघात (major accident) घडला आहे. या मार्गावर दोन दुचाकींचा अपघात (bikes collide each other) झाला आहे. दोन्ही मार्गावरून येणाऱ्या दुचाकी आपापसांत जोरदार धडकल्या. दोन्ही दुचाकी इतक्या वेगात धडकल्या की अपघातात बाईक चालक चालक रस्त्याच्या कडेला फेकला गेला. सुदैवाने कोणतीही या अपघातात जीवितहानी झाली नाही मात्र दुचाकीवर स्वारांना गंभीर दुखापत झाली आहे. (Accident caught in CCTV)
रस्त्याकडेला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या भीषण अपघाताचा थरार कैद झाला आहे. याच ठिकाणी समोरून येणाऱ्या गाड्यांचा अंदाज न आल्याने अनेक वेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी ग्रामस्थांनी रस्त्यावर गतिरोधक टाकण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे केली आहे. मात्र अद्याप त्यावर उपाययोजना केलेली दिसून येत नाही.
14 डिसेंबर 2021 रोजी दुपारच्या सुमारास हा अपघात घडला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
वसईत दुचाकी एकमेकांना धडकल्या pic.twitter.com/lEeVDFxGKO
— News18Lokmat (@News18lokmat) December 15, 2021
वाचा : OBC Reservation: "सरकारकडे राजकीय इच्छाशक्ती असेल तर आरक्षण परत येईल" - देवेंद्र फडणवीस
सीसीटीव्हीत दिसत आहे की, रस्त्याच्या एका बाजूने दोन दुचाकी जात आहेत. एका दुचाकीवर एक महिला आहे तर दुसऱ्या दुचाकीवर दोन तुरण प्रवस करत आहेत. त्याच दरम्यान रस्ता क्रॉसिंगवर एक दुसरा दुचाकीस्वार वेगाने गाडी घेऊन येतो. यावेळी दोन्ही गाड्यांचा स्पीड जास्त असल्याने दोन्ही दुचाकींवरील तरुण खाली कोसळतात तर एक दुचाकी थेट शेजारी झुडपात जाते.
भरधाव Audi कारने नागरिकांना चिरडले
एका भरधाव ऑडी कारने अनेकांना चिरडल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या भीषण अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर 9 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात राजस्थानमधील जोधपूर (Jodhpur Rajasthan) येथे घडला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या भरधाव ऑडी कारने नागरिकांना चिरडले ती गाडी राजस्थानमधील जयपूर येथील रजिस्ट्रेशनची असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताचा व्हिडीओ पाहून अक्षरशः अंगावर काटा येतो. अपघाताचा सीसीटीव्ही पाहून अपघात किती भीषण होता याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Cctv footage, Vasai