मुंबईहून रायगडला जाणाऱ्या बाईक रायडरचा भीषण अपघात, जागीच मृत्यू

मुंबईकडून गुजरातच्या दिशेने जात असताना त्याच्या बाईकचा भीषण अपघात झाला.

News18 Lokmat | Updated On: Feb 8, 2019 08:21 AM IST

मुंबईहून रायगडला जाणाऱ्या बाईक रायडरचा भीषण अपघात, जागीच मृत्यू

पालघर, 08 फेब्रुवारी : पालघरमध्ये आजची सकाळ भीषण होती. कारण चारोटी टोल नाक्याजवळील चारोटी नाका इथं पुलावर एका बाईक रायडरचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये रायडर तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

मुंबईकडून गुजरातच्या दिशेने जात असताना त्याच्या बाईकचा भीषण अपघात झाला. यात त्याच्या बाईकचा वेग असल्याने त्याला जागीच आपले प्राण गमवावे लागले आहेत. हा रायडर मुंबईचा राहणारा असल्याचं सांगण्यात येत आहे.

तर अपघात ज्या पुलावर झाला तो धोकादायक पूल असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये या पुलावर अनेक अपघात झाले आहेत. ज्यात अनेकांचा जीव गेला आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण घटनास्थळी तपासणी केली. तर त्यांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

अपघातात तरुणाला प्रचंड गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यामुळे त्याची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना अडचणी आल्या. यासंदर्भात पोलीस स्थानकात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

Loading...

एकीकडे अतीवेगामुळे अपघात होण्याचं प्रमाण वाढलं आहे. गुरुवारी सातारा इथल्या खंबाटकी घाटात केमिकल टँकर उलटल्यानं घाटातील वाहतूक काही वेळ बंद पडली होती. अनेक वाहनं घाटात अडकली असून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबली होती. पण सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.


SPECIAL REPORT : भारतात व्हाॅट्सअॅप बंद होणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2019 07:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...