Home /News /maharashtra /

प्रेमाचा दुर्दैवी शेवट, पुलावर बाईक उभी करून दोघांनी मारली खाडीत उडी, कल्याणमधील घटना

प्रेमाचा दुर्दैवी शेवट, पुलावर बाईक उभी करून दोघांनी मारली खाडीत उडी, कल्याणमधील घटना

 एका प्रेमीयुगुलाने भिवंडी- कल्याण मार्गावरील दुर्गाडी पुलावरून उडी मारून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली.

एका प्रेमीयुगुलाने भिवंडी- कल्याण मार्गावरील दुर्गाडी पुलावरून उडी मारून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली.

एका प्रेमीयुगुलाने भिवंडी- कल्याण मार्गावरील दुर्गाडी पुलावरून उडी मारून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली.

कल्याण, 18 डिसेंबर : दुचाकीवर आलेल्या एका प्रेमीयुगुलांनी (girlfriend and boyfriend)  भिवंडी- कल्याण मार्गावरील दुर्गाडी पुलावरून (Durgadi bridge on Bhiwandi-Kalyan road) उडी मारून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाचा मृतदेह सापडला असून तरुणीचा मृतदेह शोधण्याचे कार्य सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  भिवंडी- कल्याण मार्गावरील दुर्गाडी पुलावरून आज संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली.  तरुणाचे नाव प्रशांत गोडे (वय 22 वर्ष रा.कोळसेवाडी कल्याण) असं आहे. तर त्याच्यासोबत असलेल्या तरुणीचे नाव अद्याप समजू शकले नसल्याचे सांगण्यात आले असून हे  प्रेमीयुगल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हेही वाचा - विराटचा ऍटिट्यूड चांगला, पण...', वादानंतर गांगुलीचा पहिल्यांदाच कोहलीवर निशाणा! तर, ही घटना संध्याकाळच्या सुमारास घडली.  जुन्या दुर्गाडी पुलावर दोघेजण आले होते. तरुण हा त्याच्या पल्सर बाईकवर आला होता तर तरुणी स्कुटीवर आली होती. काही कळायच्या आत आधी तरुणीने उडी मारली नंतर लगेच तरुणाने उडी मारली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी शाहरुख शेख या तरुणाने दिली. घटनेची माहिती कोनगाव पोलिसांना मिळताच त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने तासाभरात प्रशांतचा मृदेह खाडी पात्रातून  बाहेर काढत उत्तरणीय तपासणीसाठी भिवंडीच्या स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयात रवाना केला. हेही वाचा - Car Loan : कार लोन घेताना 'या' गोष्टींचा नक्की विचार करा, नक्कीच फायदा होईल मृत  प्रशांत हा कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातराहणार असून त्याच्यासोबत असलेल्या तरुणीच्या मृतदेहाचा अद्यापही शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तसंच दोघांचे आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. कोनगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला. तसंच मृतक तरुणाचे नातेवाईकांना घटनेची माहिती दिल्याचेही सांगण्यात आले आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या