Home /News /maharashtra /

मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा भीषण अपघात, आईसह दोन मुलं जागीच ठार तर पती गंभीर जखमी 

मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा भीषण अपघात, आईसह दोन मुलं जागीच ठार तर पती गंभीर जखमी 

एका क्षणात कुटुंब संपलं! रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पत्नी आणि दोन मुलांचा जागीच मृत्यू

मुंबई, 27 जून : गेल्या काही दिवसांत राज्यात अनेक भीषण अपघात झाले. आताही असाच भीषण अपघात महामार्गावरील वालशिंद हद्दीत घडला आहे. एका अज्ञात वाहनाची दुचाकीला भीषण धडक बसली आहे. यामध्ये आईसह दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी असल्याची माहिती देण्यात आली आहे. राबोडी इथल्या पतीच्या मामाकडे पाहुणचार करून बोरिवली (पडघा) इथे पतीसोबत दुचाकीवरून घरी परतत असताना भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघात झाली. दुचाकीवरील महिला आणि तिची दोन मुलं यामध्ये जागीच ठार झाली तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी मुंबई नाशिक महामार्गावरील वालशिंद गावच्या हद्दीत घडली आहे. अरबीना सलीम खान (26 ), वसीम खान (5 वर्ष 6 महिने) , रिहान खान (3 वर्ष ) अशी  अपघातात ठार झालेल्या माय लेकांची नांवं आहेत. चालक पती सलीम खान (34) हा गंभीर जखमी झाला आहे. पडळकर वाद आणखी पेटला, राष्ट्रवादीच्या नेत्याला शिवीगाळ करत धमकीचे फोन सलीम यांना उपचारासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा (ऑरेंज हॉस्पिटल ) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलीम खान हा त्यांच्या ठाणे इथल्या मामाकडे पत्नी व दोन मुलांना घेऊन होंडा शाईन दुचाकीवरून गेला होता. दुपारचे जेवण उरकून तो कुटुंबियांसह बोरिवली इथे घरी परतत होते. त्यावेळी वालशिंद गावच्या हद्दीत असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. राज्यात काँग्रेसमध्ये होणार मोठे बदल? हा बडा नेता पुन्हा एकदा दिल्लीत या धडकेत दुचाकीवरील चौघेही रोडवर फेकले गेल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून दुखापत झाली. अतिरक्तस्रावाने तिघा माय लेकांचा तडफडून जागीच मृत्यू झाला तर दुचालक पती सलीम हा देखील गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताचा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास एपीआय दिपक भोई करीत आहेत. संपादन - रेणुका धायबर
First published:

Tags: Accident

पुढील बातम्या