Home /News /maharashtra /

आघाडीच्या राजकारणाला नवं वळण? पवार- ठाकरे यांच्या बैठकीत झाला महत्त्वाचा निर्णय

आघाडीच्या राजकारणाला नवं वळण? पवार- ठाकरे यांच्या बैठकीत झाला महत्त्वाचा निर्णय

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यात एक मोठा निर्णय झाल्याचं वृत्त आहे.

    मुंबई, 12 ऑक्टोबर : राज्याबरोबर महाराष्ट्राचं राजकारण पुढच्या टप्प्यावर नेणारी एक मोठी घडामोड लवकरच घडू शकते. महाराष्ट्राचे दोन पक्ष बिहारची विधानसभा निवडणूक एकत्रित लढवणार असण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट झाली असून त्यामध्ये बिहार निवडमूक एकत्र लढवण्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. एका राज्यातले दोन प्रादेशिक पक्ष एकत्रितपणे दुसऱ्या राज्यात निवडणूक लढवणार असल्याचं दुर्मिळ राजकारण यानिमित्ताने प्रत्यक्षात येऊ शकतं. ठाकरे -पवार भेटीत बिहार निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचं समजतं. शिवसेनेनं बिहार विधानसभाण निवडणुकीसाठी उमेदवार उभे केले आहेत. थेट भाजप आणि NDA ला शह देण्याचा सेनेचा प्रयत्न यात स्पष्ट दिसतो आता राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर एकत्र निवडणूक लढवली गेली, तर त्यातून नव्या राजकारणाचा उगम होऊ शकतो. नुकतीच शिवसेना खासदार संजय राऊत आणि शरद पवार यांची बैठक झाली होती, त्यामध्येही निवडणुकीय राजकारणावर चर्चा झाल्याची माहिती आहे. राज्यातल्या सध्याच्या घडामोडी आणि प्रशासकीय विषयांवरही मुख्यमंत्री आणि पवार यांच्यादरम्यान चर्चा झाली. दरम्यान मेट्रो कारशेडची जागा बदलल्यावरून सेना आणि भाजपमध्ये वाद सुरू आहेतच. उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आरेची जागा बदलून कांजूरमार्गला कारशेड हलवली. त्यावर ठाकरेंनी याचा इगो इश्यू केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्यावर राष्ट्रवादीकडून पलटवार करण्यात आला. 'आरे येथील मेट्रो कारशेड (Aarey metro car shed project) कांजूरमार्ग येथे हलविण्याचा दुर्दैवी निर्णय हा केवळ अहंकारातून झाला आहे. कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास 4000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल, असे याच सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितले. हा भुर्दंड राज्य सरकार आपल्या अहंकारासाठी कुणाच्या माथी मारू इच्छिते? आणि कशासाठी?' असे प्रश्न विचारत देवेंद्र फडणवीस (Ex CM Devendra Fadnavis) यांनी सरकारच्या निर्णयावर टीकास्त्र सोडलं होतं. राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीसांना उत्तर देत पलटवार केला आहे. मलिक म्हणाले, भाजपच मेट्रो बाबत इगो ठेऊन वागली आहे. आघाडी सरकारच्या काळात भाजपने चारकोपला कारशेडला विरोध केला होता. तो त्यांनी मानखुर्दला हलवला आहे. आरे करशेडला विरोधक तसच सत्तेतील मित्र असलेल्या शिवसेनेचंही त्यांना देखील यांनी ऐकल नाही. हा इगो नव्हता का? असला सवाल त्यांनी केला आहे. कांजूरमार्ग बाबत न्यायालयात असलेल्या सर्व बाबींचा विचार करून निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गमुळे आठ किलोमीटर मधील 5 लाख लोकांना फायदा  होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Bihar Election

    पुढील बातम्या